मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : पहिल्या इनिंगमध्ये 100+ची आघाडी घेतल्यावर किती वेळा जिंकली टीम इंडिया?

IND vs AUS : पहिल्या इनिंगमध्ये 100+ची आघाडी घेतल्यावर किती वेळा जिंकली टीम इंडिया?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीम (India vs Australia) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. भारताला पहिल्या इनिंगमध्ये 131 रनची मोठी आणि महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली आहे.

  • Published by:  Shreyas

मेलबर्न, 28 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीम (India vs Australia) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा 195 रनवर ऑल आऊट केल्यानंतर भारताने तिसऱ्या दिवशी 326 रनपर्यंत मजल मारली, त्यामुळे आता टीम इंडियाकडे 131 रनची मोठी आणि महत्त्वपूर्ण आघाडी आहे.

इतिहासातल्या आकड्यांकडे बघितलं तर 100 पेक्षा जास्त रनची आघाडी घेतल्यानंतर भारतीय टीमने फक्त एकदाच मॅच गमावली आहे. 2015 साली श्रीलंकेविरुद्ध गॉल टेस्टमध्ये भारताने 192 रनची आघाडी घेतली होती, तरीही भारताचा 63 रनने पराभव झाला होता. त्याआधी आणि त्यानंतर भारताचा कधीच 100 पेक्षा जास्त रनची आघाडी घेतल्यानंतर पराभव झालेला नाही.

याचसोबत भारताने लागोपाठ दोन टेस्ट मॅचमध्ये आघाडी घेतल्यानंतर दोन मॅच कधीच गमावल्या नाहीत. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्येही भारताने पहिल्या इनिंगमध्ये आघाडी घेतली होती, पण दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 36 रनवर ऑल आऊट झाल्यामुळे भारताला मॅच गमवावी लागली होती.

मेलबर्नमध्ये 100+ रनची आघाडी घेतल्यानंतर विजय

भारताने ऑस्ट्रेलियाचा 59 रनने पराभव केला- (1980/81) (पहिल्या इनिंगमध्ये आघाडी- 182 रन)

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 89 रनने पराभव केला- (1931/32) (पहिल्या इनिंगमध्ये आघाडी- 160 रन)

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 89 रनने पराभव केला- (1910/11) (पहिल्या इनिंगमध्ये आघाडी- 158 रन)

ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 92 रनने पराभव केला- (1972/73) (पहिल्या इनिंगमध्ये आघाडी- 133 रन)

भारताला या मॅचमध्ये मोठी आघाडी मिळवून देण्यात अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी मोलाची भूमिका बजावली. अजिंक्य रहाणेने 112 रनची तर रविंद्र जडेजाने 57 रनची खेळी केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 121 रनची पार्टनरशीप केली. त्याआधी रहाणेने हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांच्यासोबत अर्धशतकी पार्टनरशीप केली. तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे रन आऊट झाला. टेस्ट क्रिकेटमध्ये रन आऊट व्हायची रहाणेची ही पहिलीच वेळ होती.

First published: