IND vs AUS : बॉक्सिंग डे टेस्टचा पहिला दिवस भारताचा, बॉलर चमकले

IND vs AUS : बॉक्सिंग डे टेस्टचा पहिला दिवस भारताचा, बॉलर चमकले

बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारतीय बॉलरनी धमाकेदार कामगिरी केली आहे. पहिल्या दिवशी टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) डाव 195 रनवर संपुष्टात आला.

  • Share this:

मेलबर्न, 26 डिसेंबर : बॉक्सिंग डे टेस्टचा पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 36-1 एवढा आहे. शुभमन गिल 28 रनवर तर चेतेश्वर पुजारा 7 रनवर नाबाद आहेत. मागच्या मॅचप्रमाणे या मॅचमध्येही भारताची सुरुवात खराब झाली. मयंक अगरवाल शून्य रनवर माघारी परतला, पण यानंतर पुजारा आणि गिल यांनी भारताला आणखी धक्के लागू दिले नाहीत. त्याआधी भारतीय बॉलरनी चकमदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा ऑल आऊट केला. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) डाव 195 रनवर संपुष्टात आला. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर आर अश्विन याला 3 विकेट घेण्यात यश आलं. आपली पहिलीच टेस्ट मॅच खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या, तर रविंद्र जडेजा यालाही एक विकेट घेण्यात यश आलं. ऑस्ट्रेलियाकडून एकाही बॅट्समनला अर्धशतक करता आलं नाही. मार्नस लाबुशेनने सर्वाधिक 48 रनची खेळी केली. तर ट्रॅव्हिस हेडने 38 रन आणि मॅथ्यू वेडने 30 रनची खेळी केली. दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या तीन, दुसऱ्या सत्रात दोन आणि तिसऱ्या सत्रात 5 विकेट पडल्या.

ऍडलेडमध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर भारताने या टेस्टमध्ये शानदार सुरूवात केली आहे. विराट कोहली (Virat Kohli) याच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय टीम मैदानात उतरली आहे. विराट कोहलीऐवजी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्याकडे भारतीय टीमचं नेतृत्व आहे. या मॅचमध्ये भारतीय टीमने चार बदल केले. शुभमन गिल, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांना संधी मिळाली आहे. शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचं या मॅचमधून टेस्टमध्ये पदार्पण झालं आहे.

भारतीय टीम

मयंक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियन टीम

मॅथ्यू वेड, जो बर्न्स, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, टीम पेन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जॉस हेजलवूड

Published by: Shreyas
First published: December 26, 2020, 6:29 AM IST
Tags:

ताज्या बातम्या