Home /News /sport /

IND vs AUS : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला 'बॉक्सिंग' पंच, पाहा HIGHLIGHTS

IND vs AUS : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला 'बॉक्सिंग' पंच, पाहा HIGHLIGHTS

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) शानदार विजय झाला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 70 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 2 विकेट गमावून केला.

    मेलबर्न, 29 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) शानदार विजय झाला आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 70 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 2 विकेट गमावून केला. याचसोबत भारताने 4 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. अजिंक्य रहाणेचं शतक, रविंद्र जडेजाची ऑल राऊंड कामगिरी, बुमराह, अश्विन यांच्या भेदक बॉलिंगमुळे भारताने जोरदार पुनरागमन केलं. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 70 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दोन विकेट गमावल्या. मयंक अगरवाल (Mayank Agarwal) 5 रनवर तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 3 रनवर आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. शुभमन गिल (Shubhaman Gill) 30 रनवर तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 27 रनवर नाबाद राहिले. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाने 68 रनमध्ये उरलेल्या 4 विकेट गमावल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा 200 रनवर ऑल आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये 131 रनची आघाडी मिळाल्यामुळे भारताला 70 रनचं आव्हान मिळालं. दुसऱ्या इनिंगमध्ये मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) ने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि आर.अश्विनला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, उमेश यादवला एक विकेट घेण्यात यश आलं. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची अवस्था 99-6 अशी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खालच्या फळीने पुन्हा एकदा भारताला त्रास दिला. कमिन्स आणि ग्रीन यांच्यात 57 रनची पार्टनरशीप झाली. ऑस्ट्रेलियाकडून कॅमरून ग्रीनने सर्वाधिक 45 रनची खेळी केली. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव 195 रनवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताने 326 रन केले. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)ने शानदार शतक आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने अर्धशतक केलं, ज्यामुळे भारताला 131 रनची मोठी आणि महत्त्वाची आघाडी मिळाली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या