Home /News /sport /

IND vs AUS : रहाणेला मिळालं मुलाघ मेडल, 152 वर्ष जुना इतिहास

IND vs AUS : रहाणेला मिळालं मुलाघ मेडल, 152 वर्ष जुना इतिहास

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) 8 विकेटने दणदणीत विजय झाला. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं, त्यामुळे रहाणेचा मुलाघ मेडल (Mulagh Medal) देऊन सन्मान करण्यात आला.

पुढे वाचा ...
    मेलबर्न, 29 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) 8 विकेटने दणदणीत विजय झाला. पहिल्या इनिंगमध्ये शतक करणाऱ्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं, त्यामुळे रहाणेचा मुलाघ मेडल (Mulagh Medal) देऊन सन्मान करण्यात आला. दुसरी टेस्ट सुरू होण्याच्या आधीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबतची घोषणा केली होती. अजिंक्य रहाणेने पहिल्या इनिंगमध्ये 112 रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 27 रन केले. पहिल्या इनिंगमध्ये 131 रनची आघाडी घेतल्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाचा 200 रनवर ऑल आऊट केला, त्यामुळे भारताला 70 रनचं आव्हान मिळालं. 152 वर्ष जुना इतिहास जॉनी मुलाघ हे परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या टीमचे पहिले कर्णधार होते. मुलाग यांच्या नेतृत्वात 1868 साली ऑस्ट्रेलियाच्या टीमने इंग्लंडचा दौरा केला होता. मुलाघ ऑलराऊंडर होते. मुलाघ यांचं खरं नाव उनारिमिन होतं, त्यांनी 45 टेस्टमध्ये 23 च्या सरासरीने 71 इनिंगमध्ये 1,698 रन केले होते. तसंच त्यांनी 1,877 ओव्हरही टाकल्या होत्या, यातल्या 831 ओव्हर मेडन होत्या. मुलाघ यांनी 10 च्या सरासरीने 257 विकेटही घेतल्या होत्या. मुलाघ यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कामचलाऊ विकेट कीपरची भूमिकाही निभावली आणि चार स्टम्पिंग केले.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या