Home /News /sport /

ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचं नेतृत्व केलेले मराठमोळे शिलेदार!

ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचं नेतृत्व केलेले मराठमोळे शिलेदार!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला उद्या म्हणजेच 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या टेस्ट मॅचमध्ये मराठमोळा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय टीमचं नेतृत्व करेल.

    मेलबर्न, 25 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला उद्या म्हणजेच 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या टेस्ट मॅचमध्ये मराठमोळा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय टीमचं नेतृत्व करेल. विराट कोहली (Virat Kohli) याची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून भारतात परतला, त्यामुळे उपकर्णधार असलेला रहाणे आता उरलेल्या तिन्ही टेस्ट मॅचमध्ये भारताचं नेतृत्व करेल. अजिंक्य रहाणेच्याआधी तीन मराठी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात टीम इंडियाचं टेस्टमध्ये नेतृत्व केलं. पण या तिघांच्या नेतृत्वात भारताला ऑस्ट्रेलियात चमकदार कामगिरी करता आली नाही. 1947-48 साली भारतीय टीम पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. या टेस्ट सीरिजमध्ये भारताचं नेतृत्व लाला अमरनाथ यांच्याकडे होतं. 1967-68 1967-68 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्यांदाच एका मराठमोळ्या व्यक्तीने भारताचं नेतृत्व केलं. चंदू बोर्डे (Chandu Borde) यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय टीम पहिल्या टेस्टसाठी मैदानात उतरली, पण या मॅचमध्ये भारताचा 146 रननी पराभव झाला. यानंतर दुसऱ्या टेस्टपासून मन्सूर अली खान पतौडी भारताचे कर्णधार होते. या दौऱ्यातल्या चारही टेस्ट मॅच भारताने गमावल्या. 1980-81 1980-81 साली पहिल्यांदाच संपूर्ण टेस्ट सीरिजसाठी भारताला मराठी कर्णधार मिळाला. सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या नेतृत्वात भारत ऑस्ट्रेलियात तीन टेस्ट मॅच खेळली. ही सीरिज ड्रॉ करण्यात भारतीय टीमला यश आलं. सीरिजच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि चार रनने पराभव झाला, तर दुसरी टेस्ट मॅच ड्रॉ झाली. यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा 59 रनने विजय झाला. 1999-2000 1999-2000 साली सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या नेतृत्वात भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. पण या दौऱ्यात भारतीय टीमच्या पदरी सपशेल निराशा हाती आली. सीरिजच्या तिन्ही टेस्ट मॅचमध्ये भारताचा दारूण पराभव झाला होता. भारताने पहिली टेस्ट 285 रननी, दुसरी टेस्ट 180 रननी आणि तिसरी टेस्ट इनिंग आणि 141 रनने गमावली होती. 2020-2021 आता दोन दशकांनंतर भारतीय टीम पुन्हा एकदा मराठमोळ्या शिलेदारासह मैदानात उतरत आहे. अजिंक्य रहाणेकडे याआधीच्या तिन्ही कर्णधारांचा विक्रम मोडण्याची संधी असली, तरी त्याच्यापुढची आव्हानंही तितकीच मोठी आहेत. याआधी अजिंक्यने दोन टेस्ट मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं, या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये भारताचा विजय झाला, पण या दोन्ही टेस्ट मॅच भारतातच खेळवल्या गेल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशालामध्ये आणि अफगाणिस्तानविरुद्ध बंगळुरूमध्ये रहाणेने टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे, कारण भारताला ऑस्ट्रेलियात त्यांच्याच मायभूमीत आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये खेळायचं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या