मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवा, दिग्गज क्रिकेटपटूचा BCCI ला सल्ला

IND vs AUS : राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवा, दिग्गज क्रिकेटपटूचा BCCI ला सल्ला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दारूण पराभव झाला. टीम इंडियाच्या या लाजिरवाण्या कामगिरीनंतर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी राहुल द्रविड (Rahul Dravid) याला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात यावं, असा सल्ला दिला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 21 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दारूण पराभव झाला. ऍडलेडमध्ये झालेल्या या डे-नाईट टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा फक्त 36 रनवर ऑल आऊट झाला. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा निचांकी स्कोअर आहे. टीम इंडियाच्या या लाजिरवाण्या कामगिरीनंतर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी राहुल द्रविड (Rahul Dravid) याला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात यावं, असा सल्ला दिला आहे. ऍडलेडमधल्या या कामगिरीनंतर टीम इंडियावर चौफेर टीका होत आहे. स्विंग होणाऱ्या बॉलसमोर भारताची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, त्यामुळे भारतीय बॅट्समनच्या तंत्रावरच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. स्विंग बॉलिंगसमोर कसं खेळायचं हे टीम इंडियाच्या खेळाडूंना शिकवण्यासाठी राहुल द्रविडला लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाला पाठवा, असं वेंगसरकर म्हणाले आहेत. वेंगसरकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. 'बीसीसीआयने लवकरच टीमची मदत करण्यासाठी राहुल द्रविडला ऑस्ट्रेलियाला पाठवलं पाहिजे. स्विंग होणाऱ्या बॉलिंगवर कसं खेळायचं, याचं मार्गदर्शन द्रविडपेक्षा चांगलं कोणीच करू शकत नाही. द्रविडची उपस्थिती भारतीय टीमचं मनोबल वाढवेल. तसंही एनसीए मागच्या 9 महिन्यांपासून कोरोनामुळे बंद आहे,' असं वेंगसरकर म्हणाले. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर द्रविडला 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल, तरीही बीसीसीआयने द्रविडला तिकडे पाठवावं, कारण तो तिसऱ्या टेस्टपासून उपलब्ध असेल. ही टेस्ट 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे, अशी प्रतिक्रिया वेंगसकर यांनी दिली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली दुसरी टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या मॅचमध्ये कर्णधार विराट कोहली आणि दुखापत झालेल्या मोहम्मद शमीशिवाय भारतीय टीम मैदानात उतरेल.
First published:

पुढील बातम्या