IND vs AUS : बॉक्सिंग डे टेस्टसाठी टीम इंडियामध्ये चार बदल, या खेळाडूंना संधी

IND vs AUS : बॉक्सिंग डे टेस्टसाठी टीम इंडियामध्ये चार बदल, या खेळाडूंना संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टसाठी (India vs Australia) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टेस्ट मॅचसाठी भारतीय टीममध्ये चार बदल करण्यात आले आहेत.

  • Share this:

मेलबर्न, 25 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टसाठी (India vs Australia) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या टेस्ट मॅचसाठी भारतीय टीममध्ये चार बदल करण्यात आले आहेत. विराट कोहली (Virat Kohli) ऐवजी शुभमन गिल (Shubhaman Gill), ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha)ऐवजी ऋषभ पंत (Rishabh Pant), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि मोहम्मद शमीऐवजी मोहम्मद सीरिज याची टीममध्ये निवड झाली आहे. पृथ्वी शॉ याला टीममधून डच्चू देण्यात आला आहे, तर शुभमन गिल ओपनिंगला खेळेल. गिल आणि सिराज यांचं हे टेस्ट क्रिकेटमधलं पदार्पण असेल.

दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये केएल राहुल याला संधी दिली जाईल, अशी शक्यता होती, पण त्याची निवड करण्यात आलेली नाही. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्याकडे टीमचं नेतृत्व असेल. पहिल्या टेस्टमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियापुढे या टेस्टमध्ये पुनरागमन करण्याचं आव्हान असेल. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाला होता. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा निचांकी स्कोअर होता. 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे टेस्टला सुरुवात होणार आहे.

भारतीय टीम

मयंक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

Published by: Shreyas
First published: December 25, 2020, 12:24 PM IST
Tags:

ताज्या बातम्या