मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : ऑस्ट्रेलियात इतिहास घडवणाऱ्या 6 खेळाडूंना आनंद महिंद्रा देणार SUV

IND vs AUS : ऑस्ट्रेलियात इतिहास घडवणाऱ्या 6 खेळाडूंना आनंद महिंद्रा देणार SUV

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मध्ये भारताने (India vs Australia) ऐतिहासिक कामगिरी करत विजय मिळवला. यानंतर उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी टीम इंडियाच्या 6 खेळाडूंना थार एसयूव्ही (Thar SUV) द्यायचा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 24 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी करत विजय मिळवला. 4 टेस्ट मॅचची ही सीरिज भारताने 2-1 ने जिंकली. खेळाडूंना दुखापती झालेल्या असतानाही नवोदितांना घेऊन भारताने ही सीरिज जिंकल्यामुळे त्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. टीम इंडियाच्या या कामगिरीवर उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) देखील खुश झाले आहेत. या दौऱ्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहा खेळाडूंना गिफ्ट म्हणून एसयूव्ही (SUV) कार द्यायचा निर्णय महिंद्रा यांनी घेतला आहे. शुभमन गिल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. आपली पहिलीच टेस्ट सीरिज खेळणाऱ्या या 6 खेळाडूंनी दमदार कामगिरी केली, त्यामुळे आनंद महिंद्रा यांनी या सहा खेळाडूंना महिंद्रा कंपनीची थार ही एसयूव्ही द्यायचं ठरवलं आहे. शुभमन गिलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 6 इनिंगमध्ये 51.8 च्या सरासरीने 259 रन केले. ब्रिस्बेन टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये गिलने 91 रनची जबरदस्त खेळी केली, ज्यामुळे भारताला विजय मिळवता आला. तर शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ब्रिस्बेन टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 123 रनची महत्त्वाची पार्टनरशीप केली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेता आली नाही. मोहम्मद सिराज यानेही शेवटच्या इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या. टेस्ट सीरिजमध्ये सिराज हा भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर ठरला. तर शार्दुल ठाकूरला मॅचमध्ये 7 आणि नटराजन याला 3 विकेट मिळाल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या