मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : 'पुजारा शॉट खेळायला घाबरतो', ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंची टीका

IND vs AUS : 'पुजारा शॉट खेळायला घाबरतो', ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंची टीका

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार एलन बॉर्डर (Allan Border) यांनी शनिवारी तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारतीय बॅट्समनच्या रणनीतीवर टीका केली आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) शॉट मारायला घाबरतो, असं वाटत होतं. रन बनवण्याऐवजी तो क्रीजवर टिकून राहण्यासाठी खेळत होता, असं बॉर्डर म्हणाले.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

सिडनी, 10 जानेवारी : ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार एलन बॉर्डर (Allan Border) यांनी शनिवारी तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारतीय बॅट्समनच्या रणनीतीवर टीका केली आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) शॉट मारायला घाबरतो, असं वाटत होतं. रन बनवण्याऐवजी तो क्रीजवर टिकून राहण्यासाठी खेळत होता, असं बॉर्डर म्हणाले. बॉर्डर फॉक्सस्पोर्ट्स.कॉम.एयू सोबत बोलत होते. या सीरिजमध्ये पुजाराने जास्त प्रभाव पाडला नाही. पुजाराने रन बनवण्यासाठी एवढा वेळ घेतला, ज्याचा परिणाम भारताच्या बॅटिंगवर झाला. ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर पुजाराने वर्चस्व दाखवलं नाही.

'याचं श्रेय ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगलाही दिलं गेलं पाहिजे. ऑस्ट्रेलियाने कधीही भारताला दबावातून बाहेर काढलं नाही. अर्धी लढाई तर हीच आहे. बॉलरना विकेट घेण्यात अडचणी येत होत्या, पण स्कोअरबोर्ड हलतच नव्हता, शेवटी याचाच फायदा झाला,' असं बॉर्डर म्हणाले.

दुसरीकडे रिकी पॉण्टिंग (Ricky Pointing) यानेही पुजाराच्या बॅटिंगवर टीका केली आहे. पुजाराने आणखी जलद रन काढण्याची गरज होती. तो या गतीने खेळल्यामुळे इतर भारतीय बॅट्समनवर दबाव पडल्याचं मत रिकी पॉण्टिंगने मांडलं.

ऑस्ट्रेलियाचे माजी ऑल राऊंडर टॉम मूडी (Tom Moody) यांनी मात्र पुजाराचं समर्थन केलं आहे. पुजारा त्याचा नैसर्गिक खेळ खेळत होता, त्यामुळे रन काढण्याची जबाबदारी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीची होती. पुजाराने काहीही चूक केलं नाही. त्याने संपूर्ण कारकिर्दीमध्ये अशीच बॅटिंग केली आहे. त्याच्याकडून नैसर्गिक शैलीविरोधात खेळण्याची मागणी करणं चुकीचं ठरेल, असं टॉम मूडी म्हणाले. स्कोअरबोर्ड हलता ठेवण्याची जबाबदारी रहाणे आणि विहारीची होती, पण विहारीने 38 बॉलमध्ये 4 रन केले, अशी प्रतिक्रिया मूडी यांनी दिली.

First published: