IND vs AUS : विराटच्या रन आऊटनंतर मांजरेकरांना आठवला सचिन

IND vs AUS : विराटच्या रन आऊटनंतर मांजरेकरांना आठवला सचिन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs Australia) भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) रन आऊट झाला. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने केलेली चूक टीम इंडियाला महागात पडली.

  • Share this:

ऍडलेड, 18 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये (India vs Australia) भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) रन आऊट झाला. 74 रनवर खेळत असलेला कोहली शतकापर्यंत पोहोचेल असं वाटत असतानाच अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने केलेली चूक टीम इंडियाला महागात पडली. रहाणेने विराटला एक रनसाठी बोलावलं आणि विराट अर्ध्यावर आल्यानंतर त्याला नकार दिला, या गोंधळात विराट रन आऊट झाला.

कोहली आणि रहाणे यांनी 88 रनची पार्टनरशीप केली. हे दोघंही भारताला मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवतील, असं वाटत होतं, पण कोहली आऊट झाला. यानंतर रहाणेही माघारी परतला आणि भारताची बॅटिंग कोसळली.

विराटला रन आऊट केल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी अजिंक्य रहाणेवर टीका केली, तसंच अजिंक्यने विराटसाठी आपली विकेट द्यायला पाहिजे होती, असंही अनेक जण म्हणाले.

दिवसाचा खेळ संपल्यानंतर कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) आणि ग्लेन मॅकग्रा या रन आऊटवर चर्चा करत होते. यावेळी मांजरेकर यांनी अशाच एका जुन्या घटनेचा दाखला दिला, जेव्हा त्यांच्यामुळे सचिन तेंडुलकरला रन आऊट व्हावं लागलं होतं. 'मलादेखील असाच एक अनुभव आला होता. सचिन तेंडुलकरला मी चुकून आऊट केलं होतं, पण स्वत:ची विकेट वाचवली होती,' असं मांजरेकर म्हणाले. तर चर्चेमध्ये मॅकग्रा याने रहाणेने विराटसाठी आपली विकेट द्यायला पाहिजे होती, असं मत मांडलं.

8 वर्षानंतर विराट रनआऊट

8 वर्षानंतर विराट कोहली पहिल्यांदाच तर त्याच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये दुसऱ्यांदा रनआऊट झाला आहे. याआधी 2012 साली विराट ऍडलेडमध्येच विराट रनआऊट झाला होता.

Published by: Shreyas
First published: December 18, 2020, 1:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या