Home /News /sport /

IND vs AUS : ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्यची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

IND vs AUS : ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्यची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs Australia) रोमांचक विजय झाला. याचसोबत भारताने बॉर्डर गावसकर ट्रॉफीही 2-1 ने जिंकली. विराट कोहली (Virat Kohli)च्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) च्या नेतृत्वात भारताने हा इतिहास घडवला आहे.

पुढे वाचा ...
    ब्रिस्बेन, 19 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs Australia) रोमांचक विजय झाला. याचसोबत भारताने बॉर्डर गावसकर ट्रॉफीही 2-1 ने जिंकली. विराट कोहली (Virat Kohli)च्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) च्या नेतृत्वात भारताने हा इतिहास घडवला आहे. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टनंतर विराट कोहली पितृत्वाच्या रजेमुळे भारतात परतला. विराटच्या नेतृत्वात ऍडलेडमध्ये भारताला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. 36 रनवरच टीम इंडियाचा ऑल आऊट झाला. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा निचांकी स्कोअर होता. ऍडलेडमधल्या या लाजिरवाण्या पराभवानंतर अजिंक्यने टीमचं नेतृत्व स्विकारलं आणि यानंतर भारताने मागे वळून पाहिलं नाही. मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला, तर सिडनीमधली टेस्ट भारताने संघर्षमय खेळ करत ड्रॉ केली. यानंतर आता ब्रिस्बेनमध्येही शेवटचे काही बॉल शिल्लक असताना विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'ऍडलेडमधल्या पराभवानंतर आमच्यासाठी गोष्टी कठीण होत्या. प्रत्येक खेळाडूला याचं श्रेय आहे. आम्ही या विजयाचा आनंद घेत आहोत. प्रत्येक भारतीयाने याचा आनंद घ्यावा. मी भावुक झालो आहे, यावर प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्दच नाहीत,' असं रहाणे म्हणाला. 'मी जेव्हा बॅटिंगसाठी उतरलो, तेव्हाच जिंकण्यासाठी जायचं ठरवलं होतं, कारण मयंक अगरवाल आणि ऋषभ पंत अजूनही बॅटिंगला यायचे होते. त्यामुळे मीदेखील आक्रमक बॅटिंग केली. या विजयाचं श्रेय पुजारालाही आहे, कारण त्याने चिकाटीने बॅटिंग केली,' असं वक्तव्य रहाणेने केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या