Home /News /sport /

IND vs AUS : 'बडे दिलवाला' रहाणे!, हे पाहून तुम्हीही कराल अजिंक्यला सलाम

IND vs AUS : 'बडे दिलवाला' रहाणे!, हे पाहून तुम्हीही कराल अजिंक्यला सलाम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) रोमांचक विजय झाला. याचसोबत भारताने 4 टेस्ट मॅचची ही सीरिज 2-1 ने जिंकली. या विजयानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)च्या वर्तनाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

पुढे वाचा ...
    ब्रिस्बेन, 19 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) रोमांचक विजय झाला. याचसोबत भारताने 4 टेस्ट मॅचची ही सीरिज 2-1 ने जिंकली. याआधीही 2018-19 साली भारताने विराटच्या नेतृत्वात 2-1नेच विजय मिळवून दिला होता. यावेळी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मेलबर्न टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने विजय मिळवला. अजिंक्यने बॅटिंगसोबतच त्याच्या नेतृत्वाचं कौशल्यही जगाला दाखवून दिलं. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या टेस्टनंतर रहाणेने त्याला मोठ्या मनाचा माणूस असं का म्हणतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायन याला टीम इंडियाची जर्सी भेट म्हणून दिली. नॅथन लायन याची ही 100 वी टेस्ट मॅच होती, त्यामुळे रहाणेने मॅच संपल्यानंतर त्याला बोलावलं आणि ही भेट दिली. रहाणेच्या या वर्तनाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अजिंक्य रहाणेने कठीण काळामध्ये टीम इंडियाचं नेतृत्व घेतलं होतं. पहिली टेस्ट मॅच झाल्यानंतर विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी भारतात परतला होता. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाला होता, त्यानंतर रहाणेने मेलबर्नच्या बॉक्सिंग डे टेस्टपासून नेतृत्व हातात घेतलं. तेव्हापासून टीमने मागे वळून पाहिलं नाही. या काळामध्ये जवळपास अर्ध्या टीमला दुखापत झाली. या दुखापतींमुळे टीमला या सीरिजमध्ये तब्बल 20 खेळाडू वापरावे लागले, पण तरीही रहाणे खचला नाही. या सगळ्या अडचणींवर मात करत त्याने विजय खेचून आणला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या