Home /News /sport /

IND vs AUS: कोरोनामुळे भारत-ऑस्ट्रेलिया दौरा होणार रद्द? दुसऱ्या लाटेमुळे अनेक राज्यातील सीमा बंद

IND vs AUS: कोरोनामुळे भारत-ऑस्ट्रेलिया दौरा होणार रद्द? दुसऱ्या लाटेमुळे अनेक राज्यातील सीमा बंद

भारताचा हा दौरा 27 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर 17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल.

    सिडनी, 16 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट संघ (Team India) तीन वन-डे, तीन टी-20 आणि चार टेस्‍ट सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. भारताचा हा दौरा 27 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर 17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. अॅडलेडपासून कसोटी मालिकेला सुरुवा होणार आहे, मात्र त्याआधीच या सामन्यावर कोरोनाचे संकट दिसत आहे. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेतीन पहिला सामना डे-नाइट असणार आहे. कर्णधार विराट कोहलीचा हा पहिला आणि शेवटचा कसोटी सामना असेल, कारण विराट पॉटिर्निटी लिव्हसाठी भारतात परतणार आहे. मात्र या कसोटी सामन्यावर कोरोनाचे सावट आहे. अॅडलेडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे येथील सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कसोटी सामना होणार का नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अॅडलेड प्रशासनाने इतर सर्व राज्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट येत असल्यामुळे या परिसरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची चिंता वाढली आहे. वाचा-डेव्हिड वॉर्नरसोबतच्या सेक्स लाईफबद्दल बोलली पत्नी कॅन्डिस अॅडलेडमध्ये 14 दिवसांच्या क्वारंटाइनची सक्ती अॅडिलेडमध्ये 17 डिसेंबर रोजी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना होणार आहे. मात्र वेस्‍टर्न ऑस्‍ट्रेलिया, तस्‍मानिया आणि नॉर्दन क्षेत्रातील सरकारनं क्‍वींसलॅडसह सीमा बंद केल्या आहेत. यासह 14 दिवसांच्या क्वारंटाइनची सक्ती केली आहे. वाचा-IND vs AUS : टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलजवळ विमान अपघात भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी दौरा पहिला टेस्ट मॅच : 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर - अॅडिलेड दुसरी टेस्ट मॅच : 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर - मेलबर्न तिसरा टेस्ट मॅच : 07 जानेवारी ते 11 जानेवारी - सिडनी चौथी टेस्ट मॅच : 15 जानेवारी ते 19 जानेवारी - ब्रिसबेन
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket, India vs Australia

    पुढील बातम्या