मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : कॉमेंटेटरची घोडचूक, सिराजऐवजी नवदीपच्या वडिलांना वाहिली श्रद्धांजली

IND vs AUS : कॉमेंटेटरची घोडचूक, सिराजऐवजी नवदीपच्या वडिलांना वाहिली श्रद्धांजली

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या वनडे सीरिजला सुरुवात झाली. दौऱ्यातल्या पहिल्याच मॅचमध्ये कॉमेंट्री करत असताना ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू एडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) आणि शेन वॉर्न (Shane Warne) यांनी मोठी चूक केली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

सिडनी, 27 नोव्हेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या वनडे सीरिजला सुरुवात झाली. दौऱ्यातल्या पहिल्याच मॅचमध्ये कॉमेंट्री करत असताना ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू एडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) आणि शेन वॉर्न (Shane Warne) यांनी मोठी चूक केली. या दोघांनी नवदीप सैनी (Navdeep Saini) च्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली, पण मागच्या आठवड्यात मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) च्या वडिलांचं निधन झालं होतं.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग सुरू असताना सातव्या ओव्हरमध्ये विराट कोहलीने नवदीप सैनीच्या हातात बॉल दिला, तेव्हा गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न कॉमेंट्री करत होते. त्यावेळी हे दोघं नवदीप सैनीला बॉलिंग करणं सोपं जाणार नाही, कारण मागच्याच आठवड्यात त्याच्या वडिलांचं निधन झालं आहे, असं दोघं म्हणत होते. थोड्याच वेळात या दोघांची चूक लोकांनी पकडली आणि ट्विटरवर त्यांच्यावर टीका सुरू होऊ लागली. या प्रकाराबाबत गिलख्रिस्टने नंतर माफी मागितली. आपली चूक झाल्याचं ट्विट गिलख्रिस्टने केलं.

आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर मोहम्मद सिराजची टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली. पण मागच्याच आठवड्यात त्याच्या वडिलांचं निधन झालं. यानंतर बीसीसीआयने सिराजला भारतात परत पाठवण्याबाबत विचारणा केली, पण त्याने टीमसोबतच राहण्याचा निर्णय घेतला.

नवदीप सैनीला संधी

मागच्या काही दिवसांपासून नवदीप सैनीला पाठीच्या दुखण्याचा त्रास होत आहे, त्यामुळे पहिल्या वनडेच्या 10 तास आधी टी.नटराजन याला वनडे टीममध्ये स्थान देण्यात आलं. पण तरीही पहिल्या वनडेमध्ये नवदीप सैनीला खेळवण्यात आलं.

First published: