Home /News /sport /

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन बॉलर्सचे भेदक बाऊन्सर, भिंतीसारखा उभा राहिला पुजारा

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन बॉलर्सचे भेदक बाऊन्सर, भिंतीसारखा उभा राहिला पुजारा

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या ब्रिस्बेन टेस्टच्या पाचव्या दिवशी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ने किल्ला लढवला. एकीकडे शुभमन गिल (Shubhaman Gill) आक्रमक बॅटिंग करत असतानाच चेतेश्वर पुजाराने मात्र संयमी खेळी केली.

पुढे वाचा ...
    ब्रिस्बेन, 19 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या ब्रिस्बेन टेस्टच्या पाचव्या दिवशी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ने किल्ला लढवला. एकीकडे शुभमन गिल (Shubhaman Gill) आक्रमक बॅटिंग करत असतानाच चेतेश्वर पुजाराने मात्र संयमी खेळी केली. 146 बॉलमध्ये 91 रन करून गिल आऊट झाला, तर पुजाराने 211 बॉलमध्ये 56 रन केले. चेतेश्वर पुजारा फक्त मैदानात टिकूनच राहिला नाही, तर त्याने ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलर्सचे बाऊन्सरही झेलले. ऑस्ट्रेलियाच्या भेदक बॉलिंगसमोर पुजाराच्या अंगाला, खांद्याला, बोटाला आणि हेल्मेटलाही बॉल लागले, तरीही तो डगमगला नाही. पुजाराची विकेट मिळाल्यानंतर भारताला हरवणं सोपं जाईल, हे ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलरना माहिती होतं, त्यामुळे पॅट कमिन्स आणि जॉस हेजलवूड यांनी पुजाराला लक्ष्य केलं. पुजारानेही त्याच्या शरिरावर हे घाव घेतले. पुजाराच्या या संघर्षाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलरनी शुभमन गिलविरोधातही या रणनीतीचा वापर केला, पण गिलने मात्र ऑस्ट्रेलियावर उलट आक्रमण केलं. पण आपल्या पहिल्या शतकापासून तो 9 रनने कमी पडला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या