मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS 4th Test : दुसऱ्या दिवशी पावसाचा खेळ! भारताला दोन धक्के

IND vs AUS 4th Test : दुसऱ्या दिवशी पावसाचा खेळ! भारताला दोन धक्के

भारताविरुद्धच्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा(India vs Australia) 369 रनवर ऑल आऊट झाला. आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्येच भारताने कांगारूंच्या उरलेल्या 5 विकेट घेतल्या.

  • Published by:  Shreyas
ब्रिस्बेन, 16 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ (India vs Australia) पावसामुळे थांबवण्यात आला आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 62-2 असा झाला आहे. शुभमन गिल (Shubhaman Gill) 7 रनवर तर रोहित शर्मा (Rohit Sharma) 40 रन करून आऊट झाले. चेतेश्वर पुजारा 8 रनवर तर अजिंक्य रहाणे 2 रनवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडून लायन आणि कमिन्सला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. पाऊस पडत असल्यामुळे चहानंतर खेळ सुरूच झाला नाही. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा(India vs Australia) 369 रनवर ऑल आऊट झाला आहे. आजच्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्येच भारताने कांगारूंच्या उरलेल्या 5 विकेट घेतल्या. या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात ऑस्ट्रेलियाने 274-5 अशी केली होती. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. वॉर्नर आणि हॅरिस हे दोन्ही ओपनवर स्वस्तात माघारी परतले, यानंतर मार्नस लाबुशेनने (Marnus Labuschagne) स्मिथ आणि वेडसोबत पार्टनरशीप करून ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. लाबुशेन 108 रनची शतकी खेळी करून, तर स्मिथ 36 आणि वेड 45 रनवर आऊट झाला. कॅमरून ग्रीन आणि कर्णधार टीम पेन यांनीही चांगली बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाला या स्कोअरपर्यंत पोहोचवलं. पेनने 50 रन तर ग्रीनने 47 रन केले. शेवटच्या तीन विकेटनी पुन्हा एकदा भारताला त्रास दिला. तळाच्या मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि जॉस हेजलवूड यांनी मिळून 55 रन केले. लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा भारताकडून नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली. सीरिजमधल्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीमने धमाकेदार पुनरागमन करत विजय मिळवला, यानंतर तिसऱ्या टेस्टमध्येही पराभव होईल, असं वाटत असताना दुखापतींचा सामना करत विहारी आणि अश्विन शेवटच्या दिवशी मैदानात टिकून राहिले, ज्यामुळे मॅच ड्रॉ झाली. चार टेस्ट मॅचची ही सीरिज आता 1-1 ने बरोबरीत आहे. या मॅचमध्ये विजय मिळवून सीरिजवर कब्जा करण्यासाठी दोन्ही टीम मैदानात उतरल्या आहेत.
First published:

पुढील बातम्या