पालघरच्या शार्दुल ठाकूरचं जगभरात कौतुक, पाहा कोण काय म्हणाले

पालघरच्या शार्दुल ठाकूरचं जगभरात कौतुक, पाहा कोण काय म्हणाले

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs Australia) वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्या जोडीने भारताला पुन्हा एकदा लढतीमध्ये आणलं आहे.

  • Share this:

ब्रिस्बेन, 17 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs Australia) वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्या जोडीने भारताला पुन्हा एकदा लढतीमध्ये आणलं आहे. या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पिछाडी दोन अंकी रनवर आणली. भारताची अवस्था 186-6 असताना या दोघांनी 123 रनची पार्टनरशीप झाली, ज्यामुळे भारताचा स्कोअर 300 रनच्या पुढे गेला. 115 बॉलमध्ये 67 रन केल्यानंतर शार्दुल माघारी परतला.

शार्दुल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलरनी शार्दुल ठाकूरला बाऊन्सर टाकले, पण शार्दुल अजिबात डगमगला नाही, उलट त्याने कांगारूंच्या या बाऊन्सरवर सिक्स मारून प्रत्युत्तर दिलं. मुंबईच्या पालघरचा रहिवासी असणाऱ्या शार्दुल ठाकूरला या मॅचमध्ये खेळाडूंच्या दुखापतींमुळे संधी मिळाली. या संधीचं शार्दुलने सोनं केलं. बॉलिंगमध्येही त्याने ऑस्ट्रेलियाच्या 3 खेळाडूंना माघारी पाठवलं.

शार्दुल ठाकूरच्या या खेळीचं माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट रसिकांनी कौतुक केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसी याने शार्दुलच्या कव्हर ड्राईव्हची तुलना स्टीव्ह वॉच्या कव्हर ड्राईव्हशी केली आहे. तर मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर शार्दुलचा उल्लेख मुंबईच्या खडूस शाळेचा खेळाडू, असा करण्यात आला आहे. तर एका चाहत्याने शार्दुल ठाकूरचा मुंबईच्या ट्रेनने प्रवास करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे.

भारताने दाखवलेल्या धैर्याला दबंगशिवाय कोणताही शब्द नाही. अतिसुंदर ठाकूर, अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली, तर हर्षा भोगले यांनीही सुंदर-शार्दुलची ही खेळी भारताने ऑस्ट्रेलियात कशी लढत दिली, त्याचं उदाहरण असल्याचं सांगितलं.

Published by: Shreyas
First published: January 17, 2021, 11:51 AM IST
Tags:

ताज्या बातम्या