Home /News /sport /

IND vs AUS 4th Test : सुंदर-ठाकूरची जबरदस्त बॅटिंग, भारताचं धमाकेदार कमबॅक

IND vs AUS 4th Test : सुंदर-ठाकूरची जबरदस्त बॅटिंग, भारताचं धमाकेदार कमबॅक

वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्या जबरदस्त खेळीमुळे भारताने चौथ्या टेस्टमध्ये (India vs Australia) धमाकेदार पुनरागमन केलं आहे.

    ब्रिस्बेन, 17 जानेवारी : वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्या जबरदस्त खेळीमुळे भारताने चौथ्या टेस्टमध्ये (India vs Australia) धमाकेदार पुनरागमन केलं आहे. या दोघांच्या अर्धशतकामुळे भारताला 336 रनपर्यंत मजल मारता आली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला फक्त 33 रनची आघाडी मिळाली. भारताची अवस्था 186/6 अशी झालेली असताना या दोघांनी 123 रनची पार्टनरशीप केली. शार्दुल ठाकूरने 115 बॉलमध्ये 67 रन केले, तर वॉशिंग्टन सुंदर 62 रन करून आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून जॉस हेजलवूडने 5 विकेट घेतल्या, तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. नॅथन लायनला एक विकेट घेण्यात यश आलं. 33 रनची आघाडी मिळाल्यानंतर बॅटिंगला आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने सुरूवातीलाच आक्रमण केलं. मोहम्मद सिराजच्या बॉलिंगवर वॉर्नरने लागोपाठ 3 फोर मारले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 21/0 एवढा झाला आहे, त्यामुळे त्यांच्याकडे आता 54 रनची आघाडी आहे. डेव्हिड वॉर्नर 20 रनवर तर मार्कस हॅरिस 1 रनवर नाबाद खेळत आहेत. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा 369 रनवर ऑल आऊट झाला. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. वॉर्नर आणि हॅरिस हे दोन्ही ओपनवर स्वस्तात माघारी परतले, यानंतर मार्नस लाबुशेनने (Marnus Labuschagne) स्मिथ आणि वेडसोबत पार्टनरशीप करून ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. लाबुशेन 108 रनची शतकी खेळी करून, तर स्मिथ 36 आणि वेड 45 रनवर आऊट झाला. लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा कॅमरून ग्रीन आणि कर्णधार टीम पेन यांनीही चांगली बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाला या स्कोअरपर्यंत पोहोचवलं. पेनने 50 रन तर ग्रीनने 47 रन केले. शेवटच्या तीन विकेटनी पुन्हा एकदा भारताला त्रास दिला. तळाच्या मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि जॉस हेजलवूड यांनी मिळून 55 रन केले. भारताकडून नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली. मॅचच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रामध्ये पावसामुळे खेळ झाला नाही. सीरिजमधल्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीमने धमाकेदार पुनरागमन करत विजय मिळवला, यानंतर तिसऱ्या टेस्टमध्येही पराभव होईल, असं वाटत असताना दुखापतींचा सामना करत विहारी आणि अश्विन शेवटच्या दिवशी मैदानात टिकून राहिले, ज्यामुळे मॅच ड्रॉ झाली. चार टेस्ट मॅचची ही सीरिज आता 1-1 ने बरोबरीत आहे. या मॅचमध्ये विजय मिळवून सीरिजवर कब्जा करण्यासाठी दोन्ही टीम मैदानात उतरल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या