भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या इतिहासातील मोठा विजय मिळवला

भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या इतिहासातील मोठा विजय मिळवला

क्रिकेटच्या इतिहासात धावसंख्येचा पाठलाग करताना मिळवलेला हा पाचव्या क्रमांकाचा मोठा विजय ठरला आहे.

  • Share this:

मोहाली, 10 मार्च: भारताविरुद्ध झालेल्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ गडी राखून विजय मिळवला. शिखर धवनच्या आक्रमक शतकी खेळीच्या जारोवर भारताने प्रथम फलंदाजीकरत 358 धावा केल्या होत्या.आव्हानात्मक धावसंख्या घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने विजयाचे लक्ष्य १३ चेंडू राखून पार केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने एका विक्रमावर नाव कोरले आहे. क्रिकेटच्या इतिहासात धावसंख्येचा पाठलाग करताना मिळवलेला हा पाचव्या क्रमांकाचा मोठा विजय ठरला आहे.

मोहाली येथे झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून 717 धावा केल्या. मोठी धावसंख्या केल्यामुळे सामन्यावर भारताची पकड होती. त्यात भारताने 12 धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले. पण त्यानंतर पीटर हॅंड्सकॉम्बची शतकी खेळी आणि त्याला ख्वाजाने दिलेली 91 धावांची संयमी साथ यामुळे ऑस्ट्रेलिया विजयाच्या जवळ आला होता. भारतीय गोलंदाजांनी हॅंड्सकॉम्ब आणि ख्वाजा यांना बाद करत कमबॅक करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र टर्नरने 43 चेंडूत 82 धावांची वादळी खेळी केली आणि मोठा विजय मिळवून दिला.

वनडे क्रिकेटच्या इतिहासातील धावांचा पाठलाग करतानाचा हा पाचव्या क्रमांकाचा मोठा विजय आहे. या यादीत पहिल्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा नंबर आहे. त्यांनी 2006मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 435 धावांचे आव्हान पार केले होते. तर आफ्रिकेनेच पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 372 धावा करत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय मिळवला होता. इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध याच वर्षी 361 धावांचे आव्हान पार केले. 2013मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 360 धावा करत विजय संपादन केला होता.

भारताविरुद्धचा पाकिस्तानचा विक्रम मागे टाकला

भारताविरुद्ध धावांचा पाठलाग करत प्रतिस्पर्धी संघाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी पाकिस्तानने 2007मध्ये 322 धावा करत भारतावर विजय मिळवला होता.

ऑस्ट्रेलियाची ऐतिहासिक कामगिरी

एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी त्यांनी 2011मध्ये इंग्लंडविरुद्ध 334 धावा करत मोठा विजय संपादन केला होता.

चौथ्या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली आहे.

VIDEO : आकाश अंबानी आणि श्लोका यांच्या रिसेप्शनला पोहोचले राज ठाकरे!

First published: March 10, 2019, 10:47 PM IST

ताज्या बातम्या