IND vs AUS : टीम इंडियाला मोठा झटका, LIVE सामन्यातूच बाहेर गेला शिखर धवन

IND vs AUS : टीम इंडियाला मोठा झटका, LIVE सामन्यातूच बाहेर गेला शिखर धवन

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात बंगळुरू येथे निर्णयाक तिसरा एकदिवसीय सामना होत आहे. मात्र सामन्यादरम्यानच भारतीय संघाचा मोठा झटका बसला आहे.

  • Share this:

बंगळुरू, 19 जानेवारी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात बंगळुरू येथे निर्णयाक तिसरा एकदिवसीय सामना होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र सामन्यादरम्यानच भारतीय संघाचा मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू असताना शिखर धवन क्षेत्ररक्षण करता होता.

क्षेत्ररक्षण करत असताना गंभीरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळं त्याला मैदानाबाहेर घेऊन गेले. दरम्यान धवनची दुखापत गंभीर आहे की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नसून सध्या त्याचा एक्स रे काढण्यात येणार आहे. त्यामुळं धवन फलंदाजीला उतरणार की नाही याबाबत संभ्रम काय आहे. धवन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून गेल्या दोन सामन्यात त्यानं अर्धशतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या सामन्यात 96 धावांची सर्वोत्तम खेळी केली होती.

पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचचा शॉट रोखण्यासाठी शिखर धवन कव्हरला क्षेत्ररक्षण करता होता. दरम्यान आता धवनच्या जागी युजवेंद्र चहलला क्षेत्ररक्षणसाठी यावे लागले. याआधी राजकोटमध्ये बाउन्सर डोक्याला लागल्यामुळं धवन जखमी झाला होता. मात्र बंगळुरू एकदिवसीय सामन्यात खेळण्यापूर्वी त्याला तंदुरुस्त घोषित करण्यात आले होते. बेंगळुरू एकदिवसीय सामन्यात धवनच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयने, 'शिखर धवनला एक्स-रेसाठी पाठवण्यात आले आहे. त्याच्या परत आल्यानंतर आणि चौकशीनंतर खेळण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jan 19, 2020 04:29 PM IST

ताज्या बातम्या