मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Aus: नागपूर टी20बाबत अम्पायर्सनी दिली महत्वाची अपडेट, पाहा कधी सुरु होणार सामना?

Ind vs Aus: नागपूर टी20बाबत अम्पायर्सनी दिली महत्वाची अपडेट, पाहा कधी सुरु होणार सामना?

भारत वि. ऑस्ट्रेलिया टी20

भारत वि. ऑस्ट्रेलिया टी20

Ind vs Aus: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातला दुसरा टी20 सामना आज नागपुरात खेळवण्यात येतोय. पण ओल्या आऊटफिल्डमुळे हा सामना उशीरानं सुरु होणार आहे.

  • Published by:  Siddhesh Kanase
नागपूर, 23 सप्टेंबर: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातला दुसरा टी20 सामना आज नागपुरात खेळवण्यात येतोय. पण ओल्या आऊटफिल्डमुळे हा सामना नियोजित वेळेत सुरु झाला नाही. पण हा सामना होणार की नाही याबाबत अम्पायर्सनी तिसऱ्यांदा मैदानाची पाहणी करुन अपडेट दिली आहे. मैदानाचा एक भाग ओला असल्यानं खेळाडूंना खेळताना दुखापत होण्याची शक्यता असल्यानं अम्पायर्सनी सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे 8.45 वाजता शेवटची पाहणी करुन ते खेळ सुरु होण्याबाबत निर्णय देणार आहेत. 9.46 डेडलाईन अम्पायर्सनी सांगितल्याप्रमाणे 8.45 वाजता ते मैदानाची पाहणी करतील. त्यानंतर सामना सुरु करण्यासारखी परिस्थिती असेल तर सामन्याला सुरुवात करण्यात येईल. अन्यथा या सामन्यासाठी 9.45 पर्यंत अम्पायर्स परस्थिती सुधारण्यासाठी वाट पाहतील. 9.45 ला सामना सुरु झाल्यास केवळ 5-5 ओव्हर्सचा खेळ होईल. पण तसं न झाल्यास 9.46 नंतर सामना होणं शक्य नसल्याचं अंपायर्सनी स्पष्ट केलं आहे. तीन वेळा पाहणी दरम्यान या मॅचमध्ये आतापर्यंत तीन वेळा अम्पायर्सनी मैदानाची पाहणी केली. आऊटफिल्ड ओली असल्यानं 6.30 वाजता होणारी नाणेफेक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर सात वाजता अम्पायर्सनी दुसऱ्यांदा मैदानाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी आणखी एक तास उशीरानं पाहणी करणार असल्याचं सांगितलं त्यामुळे आठ वाजता वाजता तिसऱ्यांदा झालेल्या पाहणीत अम्पायर्सनी 8.45 वाजता शेवटची पाहणी करणार अस्याचं सांगितलं. मालिकेत ऑस्ट्रेलिया आघाडीवर मोहालीत झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं 209 धावांचं विशाल लक्ष्य उभारुनही ऑस्ट्रेलियानं 4 विकेट्सनी विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे नागपूरमधली दुसरी लढत टीम इंडियासाठी निर्णायक ठरणार आहे. भारताला या मालिकेतलं आव्हान राखायचं असेल तर जिंकणं गरजेचं आहे. पण जर हा सामना झाला नाही तर ऑस्ट्रेलियाची मालिकेतली आघाडी कायम राहील.
First published:

Tags: Cricket news, Sports

पुढील बातम्या