टी-20 सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव

टी-20 सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव

या विजयासह आॅस्ट्रेलियाने टी-20 सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी साधलीये.

  • Share this:

10 आॅक्टोबर : अखेर आॅस्ट्रेलियन टीमला विजयाचा किनारा लाभलाय. टी-20 च्या दुसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारताचा 8 विकेट राखून पराभव केलाय. जेसन बेहरनडाॅर्फ विजयाचा शिल्पकार ठरलाय.

गुवाहाटीमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताची आज घसरगुंडी झाली. संपूर्ण टीम अवघ्या 118 धावांवर ढेर झाली. भारताकडून फक्त केदार जाधवने सर्वाधिक 27 तर हार्दिक पांड्याने 25 रन्स करू शकले. उर्वरीत इतर खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.  जेसन बेहरनडॉर्फने सर्वाधिक 4 विकेट घेऊन टीम इंडियाला धक्का दिला.

118 रन्सचं माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आॅस्ट्रेलियन 15.3 ओव्हरमध्ये 122 रन्स करून मॅच खिश्यात घातली. या विजयासह आॅस्ट्रेलियाने टी-20 सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी साधलीये.

First published: October 10, 2017, 11:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading