मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : ऋषभ पंतनंतर आणखी एक फलंदाज झाला बाउन्सरचा शिकार, तिसऱ्या सामन्याला मुकणार?

IND vs AUS : ऋषभ पंतनंतर आणखी एक फलंदाज झाला बाउन्सरचा शिकार, तिसऱ्या सामन्याला मुकणार?

पहिल्या एकदिवसीय सामन्यात पॅट कमिन्सचा चेंडू डोक्याला लागून ऋषभ पंत जखमी झाला होता. त्यानंतर आता भारताचा आणखी एक खेळाडू जखमी झाला आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
राजकोट, 17 जानेवारी : भारतीय संघात सध्या चिंतेचा विषय आहे तो खेळाडूंचा फिटनेस. पहिल्या एकदिवसीय सामन्यात पॅट कमिन्सचा चेंडू डोक्याला लागून ऋषभ पंत जखमी झाला होता. त्यानंतर आता भारताचा आणखी एक खेळाडू जखमी झाला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन दुसऱ्या सामन्यात पॅट कमिन्सच्याच बाउन्सरवर जखमी झाला. त्यामुळं शिखर धवन दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. दरम्यान शिखर धवनची जखम गंभीर आहे की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. सध्या सावधगिरी म्हणून धवनचे स्कॅन केले जाईल आणि जर त्याच्या ची बरगड्यांना दुखापत झाली असल्यास फ्रॅक्चरही होऊ शकते. वाचा-खाली पडला पण कॅच नाही सोडला! रशीद खानच्या VIDEOने सोशल मीडियावर धुमाकूळ वाचा-साराच्या समोर कार्तिकनं सांगितला त्याचा Valentine प्लान, अशी असेल 'डेट नाइट' वाचा-#BREAKING: अखेर तारीख ठरली! निर्भयाच्या आरोपींना 1 फेब्रुवारीला देणार फाशी धवनच्या जागी चहलने केली फिल्डिंग बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शिखर धवनच्या उजव्या बाजूच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. त्यामुळं धवनच्या जागी युजवेंद्र चहलला मैदानात उतरवण्यात आले. भारतीय संघ फलंदाजी करत असताना दहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर धवन जखमी झाला. दुखापत असूनही त्याने 96 धावांची खेळी केली. वाचा-मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली, चंद्रकांत पाटील यांची कबुली याआधीही जखमी झाला आहे धवन वर्ल्ड कप दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच धवनला दुखापत झाली होती. त्यानंतर रणजी सामन्यातही दुखापत झाल्यामुळं श्रीलंका दौऱ्यातून धवनला विश्रांती देण्यात आली होती.
First published:

Tags: Cricket

पुढील बातम्या