VIDEO : मनीष पांडे झाला सुपरमॅन! हवेत उडत एका हातानं घेतला कॅच

VIDEO : मनीष पांडे झाला सुपरमॅन! हवेत उडत एका हातानं घेतला कॅच

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सामन्यात मनीष पांडेनं खेळ बदलणारा आणि सर्वात महत्त्वाचा झेल घेतला.

  • Share this:

राजकोट, 17 जानेवारी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियानं दमदार कमबॅक केला. दुसऱ्या सामन्यात भारतानं 36 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1ने बरोबरी केली आहे. भारतानं दिलेल्या 341 धावांचे बलाढ्य आव्हान पार करने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जमले नाही. तर, मोहम्मद शमीनं 3, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. या सामन्यात मनीष पांडेनं खेळ बदलणारा आणि सर्वात महत्त्वाचा झेल घेतला. पहिल्या सामन्यात 128 धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरचा महत्त्वाचा कॅच मनीष पांडेनं पकडला. त्यामुळं राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं विजय मिळवला.

या सामन्यात मोहम्मद शमीच्या तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मनीष पांडेने एका हाताने असा झेल घेतला, हे पाहून तुम्हीही हैराण व्हाल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 128 धावा करणारा वॉर्नर राजकोट वनडेमध्ये 12 चेंडूंत 15 धावा काढून बाद झाला.

वाचा-विराटसेनेनं काढला पराभवाचा वचपा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 36 धावांनी मिळवला विजय

वाचा-ऋषभ पंतनंतर आणखी एक फलंदाज झाला बाउन्सरचा शिकार, तिसऱ्या सामन्याला मुकणार?

शमीच्या चेंडूवर वॉर्नरने कव्हर पॉईंटच्या दिशेने शॉट खेळला. तेवढ्यात मनीष पांडेने हवेत उडी मारत एका हाताने शानदार संतुलित झेल पकडला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 20 धावांत पहिला विकेट गमावला. तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 6 गडी राखून 340 धावा केल्या. यात भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक 96 धावांची खेळी केली. याशिवाय केएल राहुलने 80 आणि कर्णधार विराट कोहलीने 78 धावांचे योगदान दिले.

वाचा-खाली पडला पण कॅच नाही सोडला! रशीद खानच्या VIDEOने सोशल मीडियावर धुमाकूळ

याआधी तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारतानं 10 विकेटनं गमावला. दरम्यान पहिल्याच सामन्यात ऋषभ पंत गंभीर जखमी झाल्यामुळे दुसऱ्या सामन्यात मनीष पांडेला संघात स्थान देण्यात आले. मात्र मनीष पांडे केवळ 2 धावांवर बाद झाला. दरम्यान भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक सामना रविवारी 19 जानेवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jan 17, 2020 09:41 PM IST

ताज्या बातम्या