कोलकाता 'जितबो रे', भारताने उडवला कांगारूंचा धुव्वा

कुलदीप यादवची हॅटट्रिक आणि भुवनेश्वर दमदार बाॅलिंगमुळे आॅस्ट्रेलियाचा 50 रन्सने पराभव केला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2017 10:05 PM IST

कोलकाता 'जितबो रे', भारताने उडवला कांगारूंचा धुव्वा

21 सप्टेंबर : भारताने सलग दुसऱ्याही वनडेमध्ये आॅस्ट्रेलियाला धुळ चारत दमदार विजय मिळवलाय. कुलदीप यादवची हॅटट्रिक आणि भुवनेश्वर दमदार बाॅलिंगमुळे आॅस्ट्रेलियाचा 50 रन्सने पराभव केला.

आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने पहिली बॅटिंग करत 252 रन्सचं आव्हान दिलं. अजिंक्य रहाणे शानदार अर्धशतक करत टीमची चांगली सुरुवात करून दिली. तर कॅप्टन विराट कोहलीने शानदार 92 रन्स केले पण अवघ्या 8 रन्सने शतक मात्र हुकलं. भारताने निर्धारीत 50 ओव्हरर्समध्ये 252 रन्सचं टार्गेट आॅस्ट्रेलियाला दिलं.

पण, भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे कांगारू चारीमुंड्या चीत झाले. 43.1 ओव्हरर्समध्ये आॅस्ट्रेलियन टीम 202 रन्सवर ढेर झाली.  कुलदीप यादवने वनडे करिअरमधली पहिली हॅटट्रिक घेतली. तर भुवनेश्वर कुमारने 3 विकेट घेतल्यात. हार्दिक पंड्या आणि चहलने प्रत्येकी 2 विकेट घेत आॅस्ट्रेलियन टीमला भगदाड पाडलं.  भारताने दुसरी वनडे जिंकत मालिकेत 2-0 ने आघाडी घेतलीये. विशेष म्हणजे वनडेमध्ये भारताचा हा सलग 11 वा विजय आहे. तर आॅस्ट्रेलियन टीमचा हा सलग 10 वा पराभव आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2017 10:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...