Home /News /sport /

भारताविरुद्ध वनडे आणि टी-20 सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा, 21 वर्षीय कॅमरॉन ग्रीनला मिळाली संधी

भारताविरुद्ध वनडे आणि टी-20 सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा, 21 वर्षीय कॅमरॉन ग्रीनला मिळाली संधी

अखेर डिसेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India vs Australia tour) जाणार आहे. कोरोना काळात भारतानं एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला नव्हता. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2020) भारतीय खेळाडू खेळत आहेत.

पुढे वाचा ...
    सिडनी, 29 ऑक्टोबर : भारताविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाने (Australia) संघाची घोषणा केली आहे. या 18 क्रिकेटपटूंच्या टीममध्ये 21 वर्षीय ऑलराऊंडर कॅमरॉन ग्रीनला (Camron Green) संधी मिळाली आहे. याशिवाय मोइसेस हेनरिक्स ( Moises Henriques) याचे देखील टीममध्ये पुनरागमन झाले आहे. दुखापतग्रस्त मिचेल मार्शच्या जागी त्याला संधी मिळाली आहे. पुढील महिन्यापासूनच भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होत आहे. दोन दिवसांपूर्वी बीसीसीआय (BCCI) ने देखील भारतीय संघाची घोषणा केली होती. कोण आहे कॅमरॉन ग्रीन? गेल्या आठवड्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी सेलेक्टर ग्रेग चॅपेल यांनी कॅमरॉन ग्रीनला संघात जागा देण्याची मागणी केली होती. ग्रीनने शेफील्ड टूर्नामेंटमधील सुरुवातीच्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. न्यू साऊथ वेल्स विरुद्ध त्याने एडिलेड मैदानावर 197 रन्सची जबरदस्त इनिंग खेळली होती. याशिवाय तसमानिया विरुद्ध त्याने 158 रन्सची नाबाद खेळी केली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सिलेक्शन चेअरमन ट्रेव्हर हॉन्स यांनी असे म्हटले आहे की, भविष्याचा विचार करता या खेळाडूला संधी दिली आहे. हेनरिक्सचे पुनरागमन तीन वर्षानंतर हेनरिक्सला संघामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मोइसेस हेनरिक्सने गेल्या वर्षी सिडनी सिक्सरला बिग बॅश हे टायटल मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. हेनरिक्सने ऑस्ट्रेलियासाठी अखेरीस टी-20 आणि वनडेमध्ये सहभाग घेतला होता. अशी असणार ऑस्ट्रेलियाची टीम एरॉन फिंच (कर्णधार), सीन अबॉट, अ‍ॅश्टन एगर, अ‍ॅलेक्स कॅरी, पॅट कमिंस (उपकर्णधार), कॅमरॉन ग्रीन, जॉश हेजलवूड, मोइसेस हेनरिक्स , मारनस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, एडम जम्पा. वाचा-ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळाडू कुटुंबाला घेऊन जाणार? गांगुलीचे मोठे वक्तव्य हिटमॅनचा मेडिकल रिपोर्ट आला समोर सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएलदरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. रोहितच्या हॅमस्ट्रिंग झाल्याचे सांगितले जात आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहित शर्मानं दोन सामना खेळले नाही आहेत. एवढेच नाही तर, दुखापतीमुळे बीसीसीआयनं रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातूनही वगळले आहे. भारतीय संघाचा फिजिओ नितिन पटेल यांनी निवड समितीला अशी माहिती दिली की, रोहित शर्मा उपलब्ध नाही आहे. पटेल यांनी रोहित शर्माची मेडिकल रिपोर्टही दिला होती. वाचा-ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, जखमी रोहित शर्मा संघाबाहेर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. वनडे आणि टी-20 संघाची घोषणा करण्यात आली असून या दोन्ही फॉरमॅटसाठी विराट कोहली हाच भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. तर जखमी रोहित शर्माच्या जागी मयांक अग्रवाल याला संधी देण्यात आली आहे. तर रोहितच्या अनुपस्थितीत उपकर्णधारपदाची जबाबदारी के एल राहुलच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.  IPL 2020 : ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाला आणखी एक धक्का? आता या खेळाडूला दुखापत  टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, के एल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरून चक्रवर्ती वनडे मालिकेसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, के एल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर भारत VS ऑस्ट्रेलिया सामन्यांचं असं असणार वेळापत्रक पहिला एकदिवसीय सामना - 27 नोव्हेंबर- सिडनी दुसरा एकदिवसीय सामना- 29 नोव्हेंबर-  सिडनी तिसरा एकदिवसीय सामना-02 डिसेंबर- कॅनबरा पहिला टी20 सामना - 04 डिसेंबर-  कॅनबरा दुसरा टी20 सामना- 06 डिसेंबर- सिडनी तिसरा टी20 सामना- 08 डिसेंबर-  सिडनी पहिला कसोटी सामना- 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर- एडिलेड दुसर कसोटी सामना - 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर- मेलबर्न तिसरा कसोटी सामना - 07 जानेवारी ते 11 जानेवारी- सिडनी चौथा कसोटी सामना- 15 जानेवारी ते 19 जानेवारी- ब्रिसबेन
    First published:

    Tags: Cricket, India vs Australia

    पुढील बातम्या