India vs Australia : ठरलं! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार रोहित शर्मा, फक्त 'या' मालिकेसाठी झाली निवड

India vs Australia : ठरलं! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार रोहित शर्मा, फक्त 'या' मालिकेसाठी झाली निवड

भारतीय संघ 11 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. मात्र एएनआय रिपोर्टनुसार रोहित शर्मा 11 नोव्हेंबर रोजी भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट संघाला सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही, यावरून अनेक दिवस वाद सुरू होते. मात्र आता रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या (India vs Australia) कसोटी मालिकेत संघासोबत असेल.

भारतीय संघ 11 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. मात्र एएनआय रिपोर्टनुसार रोहित शर्मा 11 नोव्हेंबर रोजी भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नाही. रोहित काहीकाळ विश्रांती केल्यानंतर कसोटी दौऱ्यात भारतीय संघात सामिल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सामिल होणार आहे. मात्र कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली असावी. ऑस्ट्रेलियामध्ये क्वारंटाइनचे नियम आहे हे लक्षात घेता रोहित टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळू शकणार नाही.

वाचा-IND vs AUS : ...तेव्हाच सुरू होणार टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियातला सराव

27 नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने, तीन टी-20 आणि 4 टेस्ट मॅच खेळणार आहेत. याआधी जेव्हा भारतीय संघाची घोषणा करण्यात आली तेव्हा, त्यात रोहितला वगळण्यात आले होते. मात्र आयपीएलच्या क्वालिफायर-1 सामन्यात रोहित मैदानात उतरला होता, त्यामुळे तो फिट असल्याची शक्यता आहे.

वाचा-ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का? आता या खेळाडूला दुखापत

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं रोहितबाबत दिली होती माहिती

भारतीय संघाबाबत बोलताना गांगुलीनं, संघाची निवड करताना अनुभवी आणि युवा अशा दोन्ही खेळाडूंनी संधी दिली आहे. मात्र हिटमॅन रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांची निवड करण्यात आलेली नाही आहे. दोन्ही खेळाडू जमखी आहे. एकीकडे रोहित शर्मा आयपीएलसाठी युएइमध्ये आहे. त्यामुळे रोहित आणि इशांतबाबत विचारले असता गांगुली म्हणाला की, " आम्ही इशांत आणि रोहितवर लक्ष ठेवून आहोत. इशांत पूर्णत: आउट झाला नाही आहे, कसोटी मालिकेसाठी त्याला संघात घेऊ शकतो. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट व्हावा असे आम्हाला वाटते, जर तो फिट असेल तर नक्की त्याचा विचार होईल".

वाचा-आधी बॅट, मग पाय-हात सगळं वापरलं तरी बाद झाला! अशी विकेट तुम्ही कधी पाहिली नसेल

भारत-विरुद्ध ऑस्ट्रेलिया दौरा

पहिली ODI : 27 नोव्हेंबर सिडनी

दुसरी ODI : 29 नोव्हेंबर - सिडनी

तिसरी ODI : 02 डिसेंबर - कॅनबरा

पहिली टी20 : 04 डिसेंबर - कॅनबरा

दुसरी टी20 : 06 डिसेंबर - सिडनी

तिसरी टी20 : 08 डिसेंबर - सिडनी

पहिला टेस्ट मॅच : 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर - एडिलेड

दुसरी टेस्ट मॅच : 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर - मेलबर्न

तिसरा टेस्ट मॅच : 07 जानेवारी ते 11 जानेवारी - सिडनी

चौथी टेस्ट मॅच : 15 जानेवारी ते 19 जानेवारी - ब्रिसबेन

Published by: Priyanka Gawde
First published: November 9, 2020, 3:20 PM IST

ताज्या बातम्या