सिडनी, 24 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट संघ 8 महिन्यांच्या कालावधीनंतर पहिला आंतरराष्ट्रीय दौरा करणार आहे. 27 नोव्हेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय, तीन टी-20 आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. 27 नोव्हेंबरपासून वनडे सीरिजला सुरुवात होईल. तर दुसरी वनडे 29 नोव्हेंबरला, तिसरी वनडे 2 डिसेंबरला होईल. यानंतर 4 डिसेंबरला पहिली टी-20, 6 डिसेंबरला दुसरी टी-20 आणि 8 डिसेंबरला तिसरी टी-20 खेळवली जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट सीरिजला 17 डिसेंबरपासून सुरूवात होईल. ऍडलेडमध्ये होणारी पहिली टेस्ट डे-नाईट असेल. यानंतर दुसरी टेस्ट मॅच 26 डिसेंबरपासून, तिसरी टेस्ट 7 जानेवारीपासून आणि चौथी टेस्ट 15 जानेवारीपासून होईल. या दौरा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे, त्याआधी नजर टाकूया रेकॉर्ड्सवर-
1. एकूण सामने
140 सामने खेळले आहेत.
भारताने जिंकले - 52
भारताचा पराभव- 78
निकाल नाही- 12
2. ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड
एकूण सामने- 96
भारताने जिंकले- 39
भारताचा पराभव- 51
निकाल नाही- 6
3. गेल्या 5 सामन्यांचा निकाल:
2020मध्ये भारतानं बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाला 7 विकेटनं हरवलं
2020मध्ये राजकोटमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला 36 विकेटनं हरवलं
2020मध्ये मुंबईमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताला 10 विकेटनं हरवलं.
2019मध्ये भारतानं ओव्हलमध्ये ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी हरवलं.
2019 दिल्लीमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताला 35 धावांनी हरवलं.
4. ऑस्ट्रेलियामधील सामन्यांचा निकाल
भारतानं 2019मध्ये ऑस्ट्रेलियाला ओव्हलमध्ये 36 धावांनी हरवले.
2019मध्ये भारतानं एडिलेडमध्ये ऑस्ट्रेलियाला 6 विकेटनं हरवले.
ऑस्ट्रेलियानं 2019मध्ये सिडनीमध्ये भारताला 34 धावांनी हरवले.
5. सगळ्यात मोठा विजय
चेम्सफोर्डमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला 1983मध्ये 118 धावांनी हरवले होते.
भारत-विरुद्ध ऑस्ट्रेलिया दौरा
पहिली ODI : 27 नोव्हेंबर सिडनी
दुसरी ODI : 29 नोव्हेंबर - सिडनी
तिसरी ODI : 02 डिसेंबर - कॅनबरा
पहिली टी20 : 04 डिसेंबर - कॅनबरा
दुसरी टी20 : 06 डिसेंबर - सिडनी
तिसरी टी20 : 08 डिसेंबर - सिडनी
पहिला टेस्ट मॅच : 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर - एडिलेड
दुसरी टेस्ट मॅच : 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर - मेलबर्न
तिसरा टेस्ट मॅच : 07 जानेवारी ते 11 जानेवारी - सिडनी
चौथी टेस्ट मॅच : 15 जानेवारी ते 19 जानेवारी - ब्रिसबेन