मुंबई, 16 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजला उद्यापासून सुरूवात होणार आहे. सीरिजची पहिली टेस्ट ऍडलेडमध्ये होणार आहे. ही मॅच डे-नाईट असल्यामुळे गुलाबी बॉलने खेळवली जाईल. परदेशामध्ये भारताचा हा पहिलाच डे-नाईट सामना असणार आहे. याआधी मागच्यावर्षी भारताने पहिल्यांदाच डे-नाईट टेस्ट खेळली होती. कोलकात्याच्या ईडन-गार्डन मैदानात झालेल्या या सामन्यात भारताचा अगदी सहज विजय झाला होता.
किती वाजता सुरू होणार मॅच?
ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट डे-नाईट असल्यामुळे भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता मॅचला सुरुवात होईल. तर टॉस 9.00 वाजता पडेल.
कोणत्या टीव्ही चॅनलवर दिसणार मॅच?
टीव्हीवर ही मॅच सोनी सिक्स, सोनी टेन-1 आणि सोनी टेन-3 वर पाहता येणार आहे.
लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?
या मॅचचं लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव ऍपवर पाहता येणार आहे.
फ्री लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅचचं फ्री लाईव्ह स्ट्रिमिंग एयरटेल पोस्टपेड आणि जियो सबस्क्रायबर एयरटेल स्ट्रीम आणि जियो टीव्हीवर पाहू शकतील.
भारतीय टीम
विराट कोहली, मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शुभमन गिल, रोहित शर्मा, हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, केएल राहुल, ऋद्धीमान साहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव
ऑस्ट्रेलियन टीम
जो बर्न्स, विल पुकोवस्की, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिन वॉर्नर, मार्कस हॅरिस, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, मिचेल नेसर, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, टीम पेन, मॅथ्यू वेड, सीन एबॉट, जॉस हेजलवूड, नॅथन लायन, जेम्स पॅटिनसन, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन