Home /News /sport /

IND vs AUS : आज वानखेडेवर दिसणार रोहित-विराटचा जलवा! मोडू शकतात तब्बल 4 रेकॉर्ड

IND vs AUS : आज वानखेडेवर दिसणार रोहित-विराटचा जलवा! मोडू शकतात तब्बल 4 रेकॉर्ड

एकीकडे विराट कोहली प्रत्येक सामन्यादरम्यान रेकॉर्ड मोडत आहे. असे फार कमी सामने असतील जेव्हा विराटने एखादा जुना रेकॉर्ड मोडला नसेल.

एकीकडे विराट कोहली प्रत्येक सामन्यादरम्यान रेकॉर्ड मोडत आहे. असे फार कमी सामने असतील जेव्हा विराटने एखादा जुना रेकॉर्ड मोडला नसेल.

मुंबईत आज पडणार रेकॉर्डचा पाऊस, हिटमॅन आणि रनमशीन मोडणार 'हे' टॉप रेकॉर्ड.

    मुंबई, 14 जानेवारी : आपल्या घरात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेला हरवल्यानंतर आजपासून टीम इंडिया मजबूत विरोधी अशा ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण ताकदीने भारतात आला आहे. या संघात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅरॉन फिंच, मार्नस लब्युशेनसारखे खेळाडू आहेत. त्याचवेळी गोलंदाजीमध्ये स्टार्क, कमिन्सची जोडी असणार आहे. असे असले तरी विराटसेनाही ही काही कमी नाही आहे. यजमान संघाचा प्रत्येक खेळाडू फॉर्ममध्ये असून ऑस्ट्रेलियाशी सामना करण्यास पूर्णपणे तयार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत क्रिकेट चाहत्यांना काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे एवढेच नाही तर एकाच दिवसात 6 रेकॉर्डही तुटू शकतात. रोहित-विराट मोडणार हे रेकॉर्ड 1. रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. रोहित शर्माने 56 धावा करताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9 हजार धावा पूर्ण करणारा रोहित 9वा भारतीय खेळाडू ठरणार आहे. 2. मुख्य म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माची बॅट विशेष तळपते. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सन 2019 मध्ये 133, 2016 मध्ये नाबाद 171 आणि 2015 मध्ये 138 धावा केल्या होत्या. 3. इतकेच नाही तर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 93 षटकार लगावले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणखी 7 षटकार ठोकताच तो 100 षटकार ठोकणारा तो दुसरा फलंदाज होईल. ख्रिस गेलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 130 षटकार लगावले आहेत. 4. तर, विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक शतक लगावत कर्णधार म्हणून सर्वाधिक वनडे शतके लगावण्याच्या यादीत पॉन्टिंगच्या पंक्तीत स्थान मिळवेल. विराट सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके मारण्याच्या यादीत आता दुसऱ्या क्रमांकावर येईल. त्याचबरोबर तो कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणाराही खेळाडूही बनेल. एवढेच नाही तर सचिन तेंडुलकरच्या घरच्या मैदानावरील सर्वाधिक वन डे शतके नोंदविण्यापासून कोहली अवघ्या एका शतकापासून दूर आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक 20 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतके ठोकण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. घरच्या मैदानावर कोहलीनं 19 शतके लगावले आहे. त्यामुळं एक शतकानं विराट सचिनला मागे टाकू शकतो. 5. दरम्यान, याआधी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौर्‍यावर आला होता तेव्हा त्यांनी एकदिवसीय मालिका 3-2 ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियानं पाच सामन्यात सुरुवातीचे 2 सामने गमावले होते. मुख्य म्हणजे 2019 वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलिया संघानं एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. असे असले तरी ऑस्ट्रेलियाचा संघ कागादावर मजबूत आहे. त्याच्या संघात वॉर्नर, फिंच, स्मिथ, कमिन्स आणि स्टार्कसारखे गोलंदाज आहेत. या खेळाडूंनी आतापर्यंत एकत्रितपणे एकूण 24 सामने खेळले आहेत, ज्यात ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 62.5 आहे. 6. ऑस्ट्रेलियन सलामीवीर अरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी यापूर्वीही 9 शतकी भागीदारी केली आहे, जर या दोघांनी पुन्हा एकदा शतकी भागीदारी केली तर ऑस्ट्रेलियाची ही सर्वात यशस्वी सलामीची जोडी बनेल. त्यांच्यापाठोपाठ मॅथ्यू हेडन आणि अ‍ॅडम गिलख्रिस्ट हे आहेत ज्यांची 16 शतकी भागीदारी आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या