IND vs AUS : पहिल्या वनडेआधी विराटचे धक्कादायक वक्तव्य, शिखर-राहुलसाठी सोडणार स्वत:चे स्थान?

IND vs AUS : पहिल्या वनडेआधी विराटचे धक्कादायक वक्तव्य, शिखर-राहुलसाठी सोडणार स्वत:चे स्थान?

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 14 जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी : श्रीलंकेला नमवल्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 14 जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. दरम्यान या सामन्याआधी विराटसमोर पेच आहे तो फलंदाजीमधील क्रमाचा. भारतीय संघात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना सलामीला उतरावे लागणार आहे. मात्र असे झाल्यास विराटला केएल राहुलला बाहेर बसवावे लागले. केएल राहुल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळं विराट कोणाला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, पहिल्या सामन्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विराटनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. विराट कोहली केएल राहुल, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना संघात जागा देण्यासाठी स्वत:ची जागा सोडू शकतो. विराटनं, “प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्माबरोबर शिखर धवन किंवा केएल राहुल यांना फलंदाजीसाठी उतरवू शकतो. मात्र त्यासाठी फलंदाजीच्या क्रमवारीत मला खाली उतरावे लागेल”, असे सांगितले. सध्या, उपकर्णधार रोहित शर्माचे स्थान निश्चित आहे. त्याचबरोबर, टीम मॅनेजमेंट कामगिरीच्या जोरावर केएल राहुल आणि शिखर धवनला वगळण्याच्या मूडमध्ये नाही. अशा परिस्थितीत विराट कोहलीला 3 नंबरचा स्लॉट सोडावा लागेल, यासाठी तोही सज्ज आहे.

वाचा-‘4 दिवसांचा कसोटी सामना आणि डायपर...’, दिग्गज क्रिकेटपटूनं ICCला केले ट्रोल

वाचा-ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकाआधी टीम इंडियाला झटका, रोहित शर्मा जखमी!

रोहित, राहुल आणि धवन खेळू शकतात

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याच्या आधी विराट कोहलीनं पत्रकार परिषदेत, “फॉर्ममध्ये असलेला प्रत्येक खेळाडू संघासाठी नेहमीच चांगला असतो. त्यामुळे रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल हे तिघेही खेळू शकतील अशी शक्यता आहे. फलंदाजीचा क्रम खाली आल्यामुळे मला खूप आनंद होईल. मी कुठे फलंदाजी करेन याचा जास्त विचार करू नका", असे सांगितले.

वाचा-IND vs NZ : न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, 'हीट'मॅन इज बॅक!

ऑस्ट्रेलिया एकदिवसीय दौरा

14 जानेवारी: पहिली वनडे (मुंबई)

17 जानेवारी: दुसरी वनडे (राजकोट)

19 जानेवारी: तिसरी वनडे (बेंगळुरू)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ-विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केदार जाधव, मनीष पांडे, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि युजवेंद्र चहल.

Published by: Priyanka Gawde
First published: January 13, 2020, 3:53 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading