News18 Lokmat

भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2017 11:37 PM IST

भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय

चेन्नई, 17 सप्टेंबर : पहिल्या एकदिवसीय सामन्य़ात भारतानं ऑस्ट्रेलियाचा २६ धावांनी पराभव केलाय. या विजयासह ५ सामन्यांच्या मालिकेत भारतानं १-० अशी आघाडी घेतलीये.

 

नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला.

पण भारताची सुरुवात चांगली झाली नाही. 11 धावात भारतानं 3 फलंदाजी गमावले. अजिंक्य रहाणे 5 धावांवर बाद झाला तर विराट शून्यावर. पण त्यानंतर हार्दीक पंड्या आणि महेंद्र सिंग धोनीनं सामन्याची सूत्र हातात घेतली.

हार्दीक पंड्यानं 83 धावांची धमाकेदार खेळी केली.तर धोनीनं 79 धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 7 गडी गमावत 281 धावा केल्या. पण पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियापुढे २१ षटकात १६४ धावांचं सुधारीत लक्ष्य ठेवण्यात आलं.

Loading...

१६४ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन टीम  भारतीय गोलंदाजांपुढे टीकले नाही. पंड्या आणि यादवनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर

चहलनी ३ विकेट्स घेतल्या.ऑस्ट्रेलिया २१ ओव्हरमध्ये ९ गडी गमावत १३७ धावा केल्या. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं १-० अशी आघाडी घेतलीये. विशेष म्हणजे  भारताचा हा सलग दहावा विजय आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यावर भारताने सलग १० ही सामने खिश्यात घातले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2017 11:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...