Home /News /sport /

8 आयसीसी टुर्नामेंटसाठी 17 देश तयार, BCCI 3 स्पर्धांसाठी इच्छुक

8 आयसीसी टुर्नामेंटसाठी 17 देश तयार, BCCI 3 स्पर्धांसाठी इच्छुक

आयसीसीच्या (ICC) 2024 ते 2031 या वर्षांमध्ये होणाऱ्या 8 स्पर्धांचं आयोजन करण्याची इच्छा 17 देशांनी व्यक्त केली आहे, यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. बीसीसीआयने (BCCI) या कालावधीमध्ये तीन स्पर्धा खेळवण्याची इच्छा आयसीसीला बोलून दाखवली आहे.

पुढे वाचा ...
    दुबई, 5 जुलै : आयसीसीच्या (ICC) 2024 ते 2031 या वर्षांमध्ये होणाऱ्या 8 स्पर्धांचं आयोजन करण्याची इच्छा 17 देशांनी व्यक्त केली आहे, यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. बीसीसीआयने (BCCI) या कालावधीमध्ये तीन स्पर्धा खेळवण्याची इच्छा आयसीसीला बोलून दाखवली आहे, यामध्ये दोन टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आणि एका चॅम्पियन्स ट्रॉफीचा (Champions Trophy) समावेश आहे. 2023 सालानंतर होणाऱ्या मर्यादित ओव्हरच्या आयसीसी स्पर्धांसाठी आयोजक शोधण्याची प्रक्रिया आयसीसीने सुरू केली आहे. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल, आयसीसी महिला आणि अंडर-19 वर्ल्ड कप या स्पर्धांच्या आयोजनासाठी वेगळी प्रक्रिया राबवली जाईल, जी या वर्षाच्या शेवटी सुरू होईल, असं आयसीसीने सांगितलं. आयसीसीच्या 2024-2031 या कालखंडात 8 वनडे आणि टी-20 स्पर्धा नियोजित आहेत. यामध्ये 2024, 2031 वर्ल्ड कप, 4 टी-20 वर्ल्ड कप आणि 2 चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. यासाठी इच्छुक सदस्यांना आयोजनाचा प्रस्ताव ठेवायला सांगण्यात आलं होतं, यामध्ये देशांनी स्वतंत्र किंवा शेजारी राष्ट्रांसोबत संयुक्त आयोजनाचा पर्याय होता. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, मलेशिया, नामीबिया, न्युझीलंड, ओमान, पाकिस्तान, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रीका, श्रीलंका, वेस्टइंडीज, युएई, अमेरिका आणि झिम्बाब्वे या देशांनी आयसीसी स्पर्धांच्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवला. 2017 साली इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयसीसीने ही स्पर्धा बंद केली होती, पण आता पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु करण्यात आली आहे. यासाठी भारतानेही आयोजनाचा प्रस्ताव दिला आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Icc, Team india

    पुढील बातम्या