IND vs WI : वाद सोडा, वेस्ट इंडिजमध्ये विराट मोडणार धोनीसह 'या' दिग्गज खेळाडूंचे मोठे रेकॉर्ड!

IND vs WI : वाद सोडा, वेस्ट इंडिजमध्ये विराट मोडणार धोनीसह 'या' दिग्गज खेळाडूंचे मोठे रेकॉर्ड!

वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली धोनीचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जुलै : भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला 3 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. दरम्यान पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ सोमवारी अमेरिकेला रवाना झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेत निवड समितीनं युवा फलंदाजांना संधी दिली आहे. तर, धोनीनं वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेतली आहे.

त्यामुळं वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली धोनीचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. या कसोटी सामन्यांसोबतच भारत कसोटी चॅम्पियनचा भाग होणार आहेत. या दोन कसोटी सामन्यात विराट धोनीला मागे टाकू शकतो.

धोनी आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार

महेंद्रसिंग धोनी आतापर्यंतचा भारताचा यशस्वी कसोटी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 60 सामन्यांपैकी 27 कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे 18 सामन्यात पराभव तर 15 सामने अनिर्वित राहिले आहेत. तर, विराटच्या नेतृत्वाखाली 46 सामन्यांपैकी 26 कसोटी सामन्यात विजय तर, 10 सामन्यात पराभव तर 10 सामने अनिर्वित राहिले होते. त्यामुळं हे दोन सामने विराटसाठी महत्त्वाचे असणार आहेत. यात दोन्ही सामन्यात भारतानं विजय मिळवल्यास विराट सर्वात यशस्वी कर्णधार होऊ शकतो.

वाचा-सानियानंतर आणखी एक भारतीय पाकची सून, 'या' क्रिकेटपटूसोबत अडकणार विवाहबंधनात

एकदिवसीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला टाकणार मागे

वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विराटकडे द्रविडचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. द्रविडनं आतापर्यंत कर्णधार म्हणून सर्वात जास्त म्हणजे 79 सामने खेळले आहेत. तर, विराटनं 77 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या मालिकेनंतर विराट द्रविडला मागे टाकणार आहे. यात यादीत धोनी 200 सामन्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. मोहम्मद अझहरुद्दीनने 174 आणि सौरव गांगुलीने 146 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

वाचा- विराट म्हणतो संघात वाद नाही, पण 'हे' फोटो सांगतात वेगळीच कहानी!

दिलीप वेंगसरकरचा हा रेकॉर्ड मोडणार विराट

या मालिकेत होणाऱ्या कसोटी सामन्यात विराट दिलीप वेंगसरकरला मागे टाकू शकतो. वेंगसरकर 116 कसोटी सामन्यात 6 हजार 868 धावा केल्या आहेत. तर, विराटकने 77 सामन्यात 6 हजार 613 धावा केल्या आहेत. या दोघांमध्ये केवळ 255 धावांचा फरक आहे. त्यामुळं विराटसाठी हा दौरा महत्त्वाचा असेल.

वाचा- 'याच्यासारखं दुर्दैव काहीच नाही', रोहितसोबतच्या वादावर विराटनं केला मोठा खुलासा

VIDEO: रस्ते, गावं पाण्याखाली; पुरामुळे हाहाकार

First published: July 30, 2019, 12:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading