IND vs WI : आता रोहित-विराटची मैदानावर होणार टक्कर, कोण होणार टी-20चा बादशाह!

विराट आणि रोहित यांच्यातील मैदानाबाहेरील वाद शमल्यानंतर आता दोघांमध्ये जास्त धावा करण्याची चढाओढ लागली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2019 01:35 PM IST

IND vs WI : आता रोहित-विराटची मैदानावर होणार टक्कर, कोण होणार टी-20चा बादशाह!

नवी दिल्ली, 30 जुलै : वर्ल्ड कपमध्ये पराभवाचा धक्का मिळाल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. भारताचे पहिले दोन टी-20 सामने अमेरिकेत झाले होते. याआधी विराटनं सोमवारी पत्रकार परिषद घेत संघातील महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली. तसेच रोहितसोबतच्या वादावर पडदा टाकला. मात्र आता मैदानावर रोहित आणि विराटमध्ये टक्कर होणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेला विराट टी-20 मध्ये मात्र रोहितच्या मागे आहे. त्यामुळं या सामन्यात विराटकडे रोहितला मागे टाकत टी-20मध्ये जास्त धावा करण्याची संधी आहे.

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 3 ऑगस्टला पहिला टी-20 सामना होणार आहे. पहिले दोन टी-20 सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे होणार असून तिसरा सामना वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. दरम्यान टी-20मध्ये सध्या विराट-रोहित यांच्यात धावांची स्पर्धा सुरु आहे. रोहितनं टी-20मध्ये 94 सामन्यात 2331 धावा केल्या आहेत. तर, विराटनं 67 सामन्यात 2263 धावा केल्या आहेत. दोघांमध्ये केवळ 68 धावांचे अंतर आहे. ही मालिका या दोन्ही फलंदाजांसाठी टी-20 वर्ल्ड कप 2020च्या दृष्टीनं महत्त्वाची आहे.

वाचा-सानियानंतर आणखी एक भारतीय पाकची सून, 'या' क्रिकेटपटूसोबत अडकणार विवाहबंधनात

'संघात गटबाजी नाही'

गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघात गटबाजी असल्याच्या चर्चा होत्या. यात विराट आणि रोहित शर्मा असे दोन गट आहेत आणि या दोघांनी वर्ल्ड कपनंतर एकमेकांशी भाष्य केलेले नव्हते. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषेदत विराटनं या प्रकरणावर भाष्य केले. विराटनं, "संघात गटबाजी असती तर आम्ही वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केलीच नसती. संघ हा सांघिक खेळीच्या जोरावर सेमीफायनलपर्यंत पोहचतो. ड्रेसिंग रूममधील वातावरण अतीशय उत्तम आहे", असे म्हणत संघातील गटबाजीवर भाष्ट केले.

Loading...

रोहितवादावर विराटनं केले भाष्य

पत्रकार परिषदेत विराटला रोहितसोबत असलेल्या वादावर विचारले असता, "या अशा चर्चा होत आहेत हेच खुप वाईट आहे. आम्ही जेव्हा चांगलं खेळतो तेव्हा सगळे आमचे कौतुक करतात, आणि आता हिच लोक अशा गोष्टी पसरवत आहेत. ड्रेसिंग रूममध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा खेळीमेळीचे वातावरण असते. भारतीय संघाला टॉपवर पोहचवणे हे आमचे ध्येय आहे", असे सांगत विराट-रोहित वादाला पुर्णविराम दिला.

वाचा- विराट म्हणतो संघात वाद नाही, पण 'हे' फोटो सांगतात वेगळीच कहानी!

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा टी-20 संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी.

वाचा- 'याच्यासारखं दुर्दैव काहीच नाही', रोहितसोबतच्या वादावर विराटनं केला मोठा खुलासा

VIDEO: रस्ते, गावं पाण्याखाली; पुरामुळे हाहाकार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 01:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...