मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL : श्रीलंका दौऱ्यात कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार? या चार खेळाडूंमध्ये रेस

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यात कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार? या चार खेळाडूंमध्ये रेस

जुलै महिन्यामध्ये भारतीय टीम श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये कर्णधार होण्यासाठी भारताच्या 4 खेळाडूंमध्ये रेस आहे.

जुलै महिन्यामध्ये भारतीय टीम श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये कर्णधार होण्यासाठी भारताच्या 4 खेळाडूंमध्ये रेस आहे.

जुलै महिन्यामध्ये भारतीय टीम श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये कर्णधार होण्यासाठी भारताच्या 4 खेळाडूंमध्ये रेस आहे.

मुंबई, 11 मे : जुलै महिन्यामध्ये भारतीय टीम श्रीलंकेच्या (India vs Sri Lanka) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. एकीकडे टीमचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडमध्ये (India vs England) असल्यामुळे या दौऱ्यात दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली जाईल. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे इंग्लंडमध्ये असल्यामुळे श्रीलंकेमध्ये टीमला नवा कर्णधारही मिळेल. या शर्यतीमध्ये सध्या चार खेळाडूंची नावं घेतली जात आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिखर धवनला (Shikhar Dhawan) श्रीलंका दौऱ्यासाठी टीमचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं. धवन टीम इंडियाचा वरिष्ठ खेळाडू आहे, तसंच नुकत्याच स्थगित झालेल्या आयपीएलमध्येही (IPL 2021) धवनने उत्कृष्ट कामगिरी केली होती. शिखर धवनशिवाय श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) हेदेखील कर्णधारपदाच्या रेसमध्ये आहेत. पण मागच्याच महिन्यात श्रेयस अय्यरच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यामुळे या दौऱ्यासाठी त्याचं फिट होणं कठीण आहे. तसंच हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांनाही वारंवार दुखापती होत आहेत, त्यामुळे कर्णधारपदाची माळ शिखर धवनच्या गळ्यात पडण्याची शक्यता जास्त आहे.

शिखर धवनसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला मागचा काही काळ कठीण राहिला. मागच्या तीन वर्षात त्याने एकही टेस्ट मॅच खेळली नाही, त्यामुळे तो आता टेस्ट टीमच्या रेसमधून बाहेर आहे. इंग्लंडविरुद्धच्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजच्या पहिल्या मॅचला 4 रनवर आऊट झाल्यानंतर धवनला उरलेल्या सामन्यांमध्ये संधी मिळाली नाही. पण वनडे सीरिजमध्ये त्याने दोन अर्धशतकं करून स्वत:ला सिद्ध करून दाखवलं.

वनडे क्रिकेटमध्ये शिखर धवनने 139 सामन्यांमध्ये 45 च्या सरासरीने 5,977 रन केले, यात 17 शतकं आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याने 63 इनिंगमध्ये 28 च्या सरासरीने आणि 11अर्धशतकांच्या मदतीने 1,673 रन केले.

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंका दौऱ्यात 13 जुलैला पहिली वनडे होईल, तर 16 आणि 19 जुलैला उरलेल्या दोन्ही मॅच खेळवल्या जातील. तर 22 जुलैपासून टी-20 सीरिजला सुरुवात होईल. 24 जुलैला दुसरी टी-20 आणि 27 जुलैला तिसरी टी-20 होईल.

या खेळाडूंमधून होणार निवड

पृथ्वी शॉ, शिखर धवन, देवदत पडिक्कल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सैमसन, मनिष पांडे, ऋतुराज गायकवाड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल तेवतिया, शिवम दुबे, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, हर्षल पटेल, खलील अहमद, जयदेव उनादकट, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चाहर

First published:
top videos

    Tags: Cricket, India Vs Sri lanka, Team india