IND vs SL : 185 ची सरासरी तरी टीममध्ये निवड नाही, संतापलेला खेळाडू म्हणाला 'कोणालाच परवा नाही'

IND vs SL : 185 ची सरासरी तरी टीममध्ये निवड नाही, संतापलेला खेळाडू म्हणाला 'कोणालाच परवा नाही'

श्रीलंका दौऱ्यासाठीच्या भारतीय टीमची (India vs Sri Lanka) घोषणा गुरुवारी बीसीसीआयने केली. टीम इंडियामध्ये निवड न झाल्यामुळे मनदीप सिंग (Mandeep Singh) नाराज झाला आहे. मनदीप आयपीएलमध्ये (IPL) पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) खेळतो.

  • Share this:

मुंबई, 11 जून : श्रीलंका दौऱ्यासाठीच्या भारतीय टीमची (India vs Sri Lanka) घोषणा गुरुवारी बीसीसीआयने केली. टीम इंडियाचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी नवोदितांना संधी देण्यात आली आहे. टीममध्ये असे 6 खेळाडू आहेत, ज्यांची पहिल्यांदाच निवड झाली आहे, पण टीम इंडियामध्ये निवड न झाल्यामुळे मनदीप सिंग (Mandeep Singh) नाराज झाला आहे. मनदीप आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळतो. मनदीपला श्रीलंका दौऱ्यासाठी आपल्याला संधी मिळेल, असं मनदीपला वाटलं होतं, पण टीममध्ये निवड न झाल्यामुळे तो निराश झाला आहे. मनदीपने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला. कोणालाच परवा नाही, फक्त जास्तीत जास्त मेहनत करा, असं कॅप्शन मनदीपने या फोटोला दिलं.

धोनीच्या नेतृत्वात पदार्पण

मनदीप सिंगने 2016 साली टीम इंडियात पदार्पण केलं होतं. धोनी (MS Dhoni) कर्णधार असताना तो 3 टी-20 मॅचही खेळला होता, यात त्याने एक अर्धशतकही केलं. 43.50 च्या सरासरीने मनदीपने 87 रन केले होते, पण यानंतर त्याला टीममधून बाहेर करण्यात आलं आणि मग त्याचं अजूनपर्यंत पुनरागमन झालं नाही.

मनदीप सिंग गेल्या काही काळापासून स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. मनदीपने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या (Sayed Mushtaq Ali Trophy) 4 इनिंगमध्ये 185 च्या सरासरीने 185 रन केले होते. आयपीएलच्या या मोसमात (IPL 2021) पंजाबनेही (Punjab Kings) मनदीपला एकही मॅच खेळण्याची संधी दिली नाही.

भारत-श्रीलंका यांच्यात पहिली वनडे 13 जुलै, दुसरी वनडे 16 जुलै आणि तिसरी वनडे 18 जुलैला होईल. तर टी-20 सीरिज 21 जुलैपासून सुरू होईल. दुसरी टी-20 23 जुलैला आणि तिसरी टी-20 25 जुलैला होईल. हे सगळे सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये होतील. शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय टीम हे सगळे सामने खेळणार आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया : शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (व्हाईस कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितिश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया

नेट बॉलर्स : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि समरजीत सिंह

Published by: Shreyas
First published: June 11, 2021, 8:10 PM IST

ताज्या बातम्या