मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : द्रविडचा प्लान यशस्वी, दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला मिळाला संकटमोचक!

IND vs SA : द्रविडचा प्लान यशस्वी, दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला मिळाला संकटमोचक!

भारतीय क्रिकेट टीम या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या (India tour of South Africa) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही टीममध्ये 3 टेस्ट आणि 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे. या दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid) वापरलेली रणनिती यशस्वी ठरली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 10 डिसेंबर : भारतीय क्रिकेट टीम या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या (India tour of South Africa) दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही टीममध्ये 3 टेस्ट आणि 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron) जलद गतीने पसरत असल्यामुळे हा दौरा 9 दिवसांनी पुढे ढकलण्यात आला. आता टेस्ट सीरिजची पहिली मॅच 26 डिसेंबरपासून सेन्च्युरियनमध्ये खेळवली जाणार आहे, पण या सीरिजआधी दिग्गज खेळाडूंचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मागच्या काही वर्षांपासून टीम इंडियाच्या मधल्या फळीचे महत्त्वाचे शिलेदार आहेत, पण दोघंही सध्या फॉर्मसाठी झगडत आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियासाठी ही सगळ्यात मोठी अडचण ठरू शकते, पण कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid) यावर उपाय काढला आहे.

दक्षिण आफ्रिका दौरा सोपा असणार नाही, हे राहुल द्रविडला आधीच माहिती होतं. तिथल्या बाऊन्स असलेल्या खेळपट्टीवर बॅटिंग करणं भारतीय खेळाडूंसाठी कायमच अडचणीचं असतं, त्यातच रहाणे, पुजारा आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) फॉर्ममध्ये नाहीत. भारताच्या मधल्या फळीचा संघर्ष पाहता द्रविडने हनुमा विहारीला (Hanuma Vihari) न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजऐवजी इंडिया-एसोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाठवलं आणि श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये संधी दिली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी विहारीला तिथलं वातावरण आणि खेळपट्टी समजावी, तसंच श्रेयस अय्यरलाही टेस्ट खेळण्याची संधी मिळावी, असा द्रविडचा विचार होता. द्रविडच्या या दोन्ही रणनिती भारतासाठी फायद्याच्या ठरल्या. आपल्या पदार्पणाच्या टेस्टमध्येच श्रेयस अय्यरने शतक आणि अर्धशतक केलं, हा विक्रम करणारा तो भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला. या कामगिरीमुळे श्रेयस अय्यरची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही निवड करण्यात आली.

द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होताच टीम इंडियाच्या रणनितीमध्ये बदल झाला आहे. तो कोणत्याही महत्त्वाच्या सीरिजआधी इंडिया-ए ला त्या देशात खेळण्यासाठी पाठवतो. इंडिया-एचा दक्षिण आफ्रिका दौरादेखील याच रणनितीचा भाग होता.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टेस्ट सीरिजमध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अपयशी ठरले तर हनुमा विहारी टीम इंडियाचा संकटमोचक होऊ शकतो. इंडिया-ए च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने हे सिद्ध केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची अनधिकृत टेस्ट सीरिज ड्रॉ झाली, पण हनुमा विहारीची बॅट चमकली. त्याने इंडिया-ए साठी सर्वाधिक 227 रन केले. 5 इनिंगमध्ये त्याने 3 अर्धशतकं केली आणि दोनवेळा तो नाबाद राहिला. विहारीच्या या कामगिरीमुळे तोदेखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पर्याय म्हणून समोर आला आहे.

First published:

Tags: Rahul dravid, Team india