मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /BCCI ने थांबवली टीम इंडियाच्या निवड समितीची बैठक, समोर आली मोठी Update

BCCI ने थांबवली टीम इंडियाच्या निवड समितीची बैठक, समोर आली मोठी Update

भारतीय क्रिकेट टीम 9 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India vs South Africa) जाणार आहे, यासाठी आता फक्त एका आठवड्याचाच कालावधी शिल्लक आहे. तरीही निवड समितीने अजून टीमची घोषणा केलेली नाही.

भारतीय क्रिकेट टीम 9 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India vs South Africa) जाणार आहे, यासाठी आता फक्त एका आठवड्याचाच कालावधी शिल्लक आहे. तरीही निवड समितीने अजून टीमची घोषणा केलेली नाही.

भारतीय क्रिकेट टीम 9 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India vs South Africa) जाणार आहे, यासाठी आता फक्त एका आठवड्याचाच कालावधी शिल्लक आहे. तरीही निवड समितीने अजून टीमची घोषणा केलेली नाही.

मुंबई, 1 डिसेंबर : भारतीय क्रिकेट टीम 9 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India vs South Africa) जाणार आहे, यासाठी आता फक्त एका आठवड्याचाच कालावधी शिल्लक आहे. तरीही निवड समितीने अजून टीमची घोषणा केलेली नाही. याचं कारण बीसीसीआयला (BCCI) अजूनही भारत सरकारकडून दौऱ्याची परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे निवड समितीची बैठक थांबवण्यात आली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे (Omicron Variant) दक्षिण आफ्रिकेला धोक्याच्या देश म्हणून सांगितलं जातंय.

भारत सरकारने अजूनही दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मंजुरी दिलेली नाही, त्यामुळे जोपर्यंत गोष्टी स्पष्ट होत नाहीत, तोपर्यंत टीम दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार नाही. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या कानपूर टेस्टनंतर निवड समितीची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बैठक होणार होती. भारत सरकारने जर परवानगी दिली तर मुंबईतल्या दुसऱ्या टेस्टदरम्यान निवड समितीची बैठक होईल. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्याला हिरवा झेंडा मिळवण्यासाठी भारत सरकारकडून परवानगी घ्यावी, असं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते.

इनसाईड स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय टीमचे काही सदस्य या दौऱ्यावरून संभ्रमात आहेत. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, केएल राहुल आणि टेस्ट खेळणाऱ्या इतर खेळाडूंना 8 किंवा 9 तारखेला दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्याआधी मुंबईत एका छोट्या शिबिरासाठी यायला सांगण्यात आलं होतं, पण आता नेमकं काय करायचं, हे खेळाडूंना माहिती नाही.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) भारत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाईल, असा विश्वास दाखवला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असंही गांगुली म्हणाला. 'दौरा सध्या तरी नियोजित आहे, कारण सध्या तरी गोष्टी स्थिर आहेत. निर्णय घ्यायला अजून बराच वेळ आहे, कारण पहिली टेस्ट 17 डिसेंबरला सुरू होणार आहे. आम्ही यावर विचार करू. खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य बीसीसीआयची प्राथमिकता आहे, यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू,' असं गांगुलीने सांगितलं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडिया 3 टेस्ट, 3 वनडे आणि 4 टी-20 मॅच खेळणार आहे.

भारत सरकारने दक्षिण आफ्रिका दौऱ्याला परवानगी दिलेली नसल्यामुळे फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) भारत एच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार नाही. शार्दुल 1 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणार होता, पण त्याला दक्षिण आफ्रिकेला न जाता मुंबईत सीनियर टीम कॅम्पमध्ये जायला सांगण्यात आलं आहे. ठाकूर 6 डिसेंबरपासून भारत ए आणि दक्षिण आफ्रिका ए यांच्यातली 4 दिवसांची मॅच खेळणार होता.

First published:
top videos

    Tags: Team india