मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा, 10 सामन्यांचं Schedule जाहीर

IND vs SA : टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा, 10 सामन्यांचं Schedule जाहीर

भारतीय टीमच्या दक्षिण आफ्रिका (India tour of South Africa) दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यातमध्ये भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे, या दौऱ्यात एकूण 10 मॅच होणार आहेत.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 9 सप्टेंबर : भारतीय टीमच्या दक्षिण आफ्रिका (India tour of South Africa) दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यातमध्ये भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेत जाणार आहे, या दौऱ्यात एकूण 10 मॅच होणार आहेत, ज्यात तीन टेस्ट मॅचचा समावेश आहे. ही सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC) भाग असेल. याआधी दक्षिण आफ्रिकेची टीम तीन वनडे मॅचच्या सीरिजसाठी भारतात आली होती, पण कोरोनामुळे एका मॅचनंतरच ही सीरिज स्थगित करण्यात आली.

टीम इंडिया मागच्यावर्षी ऑगस्ट आणि मग सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात टी-20 सीरिज खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार होती, पण ऑगस्ट महिन्यात कोरोना आणि मग आयपीएलमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेत 3 टेस्ट, 3 वनडे आणि 4 टी-20 मॅच खेळणार आहे. मॅचच्या ठिकाणांची मात्र अजून घोषणा करण्यात आलेली नाही.

17 डिसेंबरपासून सीरिज सुरू

दौऱ्याची सुरूवात टेस्ट सीरिजपासून होणार आहे. पहिली टेस्ट 17 ते 21 डिसेंबर, दुसरी टेस्ट 26-30 डिसेंबर आणि तिसरी टेस्ट 3-7 जानेवारीदरम्यान होईल. तर तीन वनडे 11 जानेवारी, 14 जानेवारी आणि 16 जानेवारीला होईल. 4 टी-20 मॅच 19 जानेवारी, 21, 23 आणि 26 जानेवारीला होतील.

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत अजूनपर्यंत एकही सीरिज जिंकता आलेली नाही. दोन्ही टीममध्ये आतापर्यंत 7 टेस्ट सीरिज झाल्या, यातल्या 6 दक्षिण आफ्रिकेने जिंकल्या तर एक सीरिज ड्रॉ झाली. 1992-93 साली झालेल्या 4 मॅचच्या सीरिजमध्ये आफ्रिकेचा 1-0 ने विजय झाला. तर 1996-97 साली 2-0, 2001-02 साली 1-0, 2006-07 साली 2-1, 2013-14 साली 1-0 ने आफ्रिकेने सीरिज जिंकली. 2017-18 साली दक्षिण आफ्रिकेने 2-1 ने विजय मिळवला होता, तर 2010-11 सालची सीरिज 1-1 ने ड्रॉ झाली.

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

टेस्ट सीरिज

17 ते 21 डिसेंबर- पहिली टेस्ट

26 ते 30 डिसेंबर- दुसरी टेस्ट

3 ते 7 जानेवारी- तिसरी टेस्ट

वनडे सीरिज

11 जानेवारी- पहिली वनडे

14 जानेवारी- दुसरी वनडे

16 जानेवारी- तिसरी वनडे

टी-20 सीरिज

19 जानेवारी- पहिली टी-20

21 जानेवारी- दुसरी टी-20

23 जानेवारी- तिसरी टी-20

26 जानेवारी- चौथी टी-20

First published: