• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • सूर्यकुमार यादव 65 दिवसांनंतर पत्नीला भेटला, इंग्लंडच्या रस्त्यावर केला डान्स, VIDEO

सूर्यकुमार यादव 65 दिवसांनंतर पत्नीला भेटला, इंग्लंडच्या रस्त्यावर केला डान्स, VIDEO

सूर्यकुमार यादवचा पत्नीसोबत डान्स

सूर्यकुमार यादवचा पत्नीसोबत डान्स

टीम इंडियाचा आक्रमक बॅट्समन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या इंग्लंड दौऱ्यावर (India tour of England) आहे. श्रीलंका दौऱ्यात धमाकेदार कामगिरी केल्यानंतर त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

 • Share this:
  लंडन, 20 ऑगस्ट : टीम इंडियाचा आक्रमक बॅट्समन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या इंग्लंड दौऱ्यावर (India tour of England) आहे. श्रीलंका दौऱ्यात धमाकेदार कामगिरी केल्यानंतर त्याची इंग्लंड दौऱ्यासाठी बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. शुभमन गिल, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे सूर्यकुमार यादवला इंग्लंडला बोलावण्यात आलं. श्रीलंकेहून थेट इंग्लंडला गेल्यामुळे सूर्यकुमार यादव बरेच दिवस आपल्या पत्नीला भेटला नव्हता. अखेर सूर्याची पत्नी त्याला भेटण्यासाठी थेट इंग्लंडला पोहोचली, यानंतर सूर्यकुमारने पत्नी देविशा शेट्टीसोबत डान्स केला. याचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. 65 दिवसांनंतर पत्नीला भेटलो, असं कॅप्शन सूर्यकुमारने त्याच्या व्हिडिओला दिलं. या व्हिडिओमध्ये सूर्या पत्नीसोबत इंग्लंडच्या रस्त्यांवर डान्स करत आहे.
  सूर्याला पदार्पणाची संधी? सूर्यकुमार यादव इंग्लंड दौऱ्यावर गेला असला तरी त्याला खेळण्याची संधी मिळणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. लॉर्ड्स टेस्टआधी सूर्याला पदार्पणाची संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती, पण लॉर्ड्सवर टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय झाला. तसंच बराच काळ संघर्ष करणाऱ्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारालाही (Cheteshwar Pujara) सूर गवसला, त्यामुळे आता सूर्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. सूर्यकुमार यादवने श्रीलंका सीरिजमध्ये 3 मॅच खेळून 62 च्या सरासरीने 124 रन केले, त्यामुळे त्याला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. टी-20 सीरिजच्या पहिल्या मॅचमध्येही त्याने अर्धशतक केलं होतं, पण कोरोना झालेल्या कृणाल पांड्याच्या संपर्कात आल्यामुळे सूर्याला उरलेल्या दोन टी-20 खेळता आल्या नाहीत. या दोन्ही मॅचमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आणि सीरिजही 1-2 ने गमवावी लागली.
  Published by:Shreyas
  First published: