मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /इंग्लंड दौरा टीम इंडियासाठी कठीण, अनेक दिग्गजांच्या करियरला लागला ब्रेक

इंग्लंड दौरा टीम इंडियासाठी कठीण, अनेक दिग्गजांच्या करियरला लागला ब्रेक

टीम इंडिया (Team India) जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. इंग्लंड दौरा टीम इंडियासाठी कधीच सोपा राहिला नाही. इंग्लंड दौऱ्यावेळीच टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंच्या करियरला ब्रेक लागला.

टीम इंडिया (Team India) जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. इंग्लंड दौरा टीम इंडियासाठी कधीच सोपा राहिला नाही. इंग्लंड दौऱ्यावेळीच टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंच्या करियरला ब्रेक लागला.

टीम इंडिया (Team India) जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. इंग्लंड दौरा टीम इंडियासाठी कधीच सोपा राहिला नाही. इंग्लंड दौऱ्यावेळीच टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंच्या करियरला ब्रेक लागला.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 मे: टीम इंडिया (Team India) जून महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. साऊथम्पटनमध्ये 18 ते 22 जून या कालावधीमध्ये भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल. यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारत-इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाईल. इंग्लंड दौरा टीम इंडियासाठी कधीच सोपा राहिला नाही. खेळाडू आणि टीमला इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. इंग्लंडमध्ये खेळलेल्या 62 टेस्टपैकी टीम इंडियाला फक्त 7 टेस्टच जिंकता आल्या, तर 34 टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला. इंग्लंड दौऱ्यावेळीच टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंच्या करियरला ब्रेक लागला.

शिखर धवन : टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) मर्यादित ओव्हरचा चांगला बॅट्समन आहे. आयपीएल 2021 मध्ये शिखर धवन सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. धवनने त्याच्या करियरमध्ये 34 टेस्ट खेळल्या, यात त्याने 7 शतकं आणि 5 अर्धशतकं केली. 35 वर्षांच्या शिखर धवनच्या करियरला इंग्लंडमध्येच ब्रेक लागला. 34 टेस्टमध्ये त्याने 41 च्या सरासरीने 2,315 रन केले. जुलै महिन्यात श्रीलंकेला जाणाऱ्या टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी धवनला दिली जाऊ शकते.

ऑगस्ट-सप्टेंबर 2018 साली इंग्लंड दौऱ्यात शिखर धवनला 4 टेस्ट खेळण्याची संधी मिळाली होती. 8 इनिंगमध्ये त्याला एकही अर्धशतक करण्याची संधी मिळाली नव्हती, 44 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. 8 इनिंगमध्ये त्याने 162 रन केले होते. इंग्लंडच्या ओव्हल मैदानात 7 सप्टेंबरला धवन शेवटची टेस्ट खेळला, या सामन्यात त्याने 3 आणि 1 रन केले. यानंतर अजूनही धवनला टेस्ट टीममध्ये संधी मिळाली नाही. त्या सीरिजमध्ये भारताचा 4-1 ने पराभव झाला होता.

दिनेश कार्तिक : 35 वर्षांच्या दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) टीम इंडियासाठी 26 टेस्ट खेळल्या. 25 च्या सरासरीने त्याने 1,025 रनही केल्या, यात एक शतक आणि 7 अर्धशतकं आहेत. कार्तिकनेही त्याची अखेरची टेस्ट इंग्लंडमध्येच 2018 साली खेळली. त्या दौऱ्यात कार्तिकला दोन टेस्ट खेळण्याची संधी मिळाली होती. या 4 इनिंगमध्ये त्याला तीन वेळा 10 रनचा आकडाही गाठता आला नव्हता. 20 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. 4 इनिंगमध्ये कार्तिकला 21 रनच करता आले.

एस.श्रीसंत : फास्ट बॉलर एस.श्रीसंत (S. Sreesanth) टीम इंडियाकडून 27 टेस्ट, 53 वनडे आणि 10 टी-20 खेळला. श्रीसंतने 2011 साली इंग्लंडच्या ओव्हलमध्ये अखेरची टेस्ट खेळली. 2013 साली स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतवर बंदी घालण्यात आली. त्याने 27 टेस्टमध्ये 38 च्या सरासरीने 87 विकेट घेतल्या. श्रीसंतने टेस्ट क्रिकेटमध्ये तीनवेळा पाच विकेट आणि चार वेळा चार विकेटही घेतल्या. 2011 साली इंग्लंड दौऱ्यात त्याला 3 टेस्ट खेळण्याची संधी मिळाली, यात त्याने 8 विकेट घेतल्या. यानंतर त्याला टेस्ट क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही.

आरपी सिंग : डावखुरा फास्ट बॉलर आरपी सिंग (RP Singh) 14 टेस्ट, 58 वनडे आणि 10 टी-20 खेळला. 2007 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय टीमचाही आरपी सिंग भाग होता. त्याने टेस्ट क्रिकेटमद्ये 42 च्या सरासरीने 40 विकेट घेतल्या. 2011 साली इंग्लंड दौऱ्यानंतर त्याला टेस्ट टीममध्ये जागा मिळाली नाही. 2011 साली ओव्हलमध्ये आरपीला टीममध्ये स्थान मिळालं, पण 34 ओव्हर टाकून त्याला एकही विकेट घेता आली नाही.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Team india