भारत वि. न्यूझिलंड दुसऱ्या वन डेत पैसे घेऊन पिच तयार केल्याचा आरोप

इंडिया टुडेने केलेल्या स्टिंगमध्ये पुणे क्युरेटरचे कारनामे समोर आले. या स्टिंगमध्ये दोन्हीपैकी कोणतीही टीम सहभागी नाहीय, तर बुकींच्या सांगण्यानुसार पिच तयार करून देतो, असं पिचचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर म्हणाले.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 25, 2017 01:40 PM IST

भारत वि. न्यूझिलंड दुसऱ्या वन डेत पैसे घेऊन पिच तयार केल्याचा आरोप

25 आॅक्टोबर : आज पुण्यात होणारी भारत न्यूझिलंड दुसरी वन डे रद्द होण्याची शक्यता आहे. वन डे मॅचच्या पिचची क्युरेटरकडून विक्री झाल्याचं इंडिया टुडेनं केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झालंय. पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकरांना निलंबित करण्यात आलंय.

इंडिया टुडेने केलेल्या स्टिंगमध्ये पुणे क्युरेटरचे कारनामे समोर आले. या स्टिंगमध्ये दोन्हीपैकी कोणतीही टीम सहभागी नाहीय, तर बुकींच्या सांगण्यानुसार पिच तयार करून देतो, असं पिचचे क्युरेटर पांडुरंग साळगावकर म्हणाले. इंडिया टुडे चॅनलनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

इंडिया टुडेचे काही पत्रकार बुकी बनून क्युरेटर साळगावकरांकडे गेले. आयसीसी आणि बीसीसीआय अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कुणालाही पिचची पाहणी करण्याची परवानगी नसते. पण या क्युरेटरनं या पत्रकारांना पिच पाहू दिलं. तुम्ही सांगाल तसं पिच बनवू, असं हे क्युरेटर महाशय म्हणाले.

आता पुण्याचा हा सामना होऊ द्यायचा की नाही, याबाबत बीसीसीआय आणि आयसीसीचं बोलणं सुरू आहे, निर्णय लवकरच अपेक्षित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2017 12:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...