सानियानं शेअर केला फोटो; युजर्सनी विचारलं, हा कसला ड्रेस घातलास?

सानियानं शेअर केला फोटो; युजर्सनी विचारलं, हा कसला ड्रेस घातलास?

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा सोशल मीडियावर सक्रीय असते. पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकसोबत लग्न केल्यानंतर अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलं होतं. आता तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या पेहरावावरून युजर्सनी टीका करायला सुरुवात केली आहे. सानिया मिर्झानं सिल्वर रंगाचा ड्रेस घातला आहे. त्या फोटोवरून मजेशीर कमेंट केल्या जात आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील दोन्ही चाहत्यांनी यावर टीका केली आहे.

सानिया मिर्झा गेल्या वर्षी आई झाली होती. त्यानंतर एकाही आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ती खेळलेली नाही. मात्र सानियाने आता फिटनेसकडे लक्ष दिलं असून टेनिसचा सरावसुद्धा सुरू केला आहे. तिने 2010 मध्ये शोएब मलिकसोबत लग्न केलं होतं.

सानिया मिर्झाने नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्ट केलं की, करिअरमध्ये तिने आतापर्यंत एवढं काही सिद्ध करून दाखवलं की, दुसऱ्या इनिंगमध्ये तिला काहीही सिद्ध करून दाखवायचं नाही.

पुढच्यावर्षी जानेवारीमध्ये ती कमबॅक करण्याच्या प्रयत्नांत आहे. आई झाल्यानंतर सानियाने दोन वर्षांहून मोठा ब्रेक घेतला. पण आता ती आगामी स्पर्धेची तयारी करत आहे. 32 वर्षांची सानिया रोज चार तास टेनिसची प्रॅक्टिस करत आहे. याशिवाय या काळात तिने स्वतःचं 26 किलो वजनदेखील कमी केलं.

सानियाने आतापर्यंत सहा डबल्स ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच ती जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावरही होती. याशिवाय स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिससोबत तिने डब्ल्यूटीएच्या अनेक स्पर्धा जिंकल्या.

VIDEO : उदनराजे आणि सुनील तटकरे पक्ष सोडण्याची चर्चा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Published by: Suraj Yadav
First published: August 21, 2019, 12:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading