• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'मला जज करू नका', म्हणत स्मृती मंधानाने शेयर केला भन्नाट Dance Video

'मला जज करू नका', म्हणत स्मृती मंधानाने शेयर केला भन्नाट Dance Video

smriti mandhana

smriti mandhana

पिंक बॉल टेस्टमध्ये शतक झळकावणारी भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) सध्या एका नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने आपल्या सहकारी खेळाडूंसोबत कोलंबिया गायकाच्या गाण्यावर केलेला भन्नाट डान्स व्हायरल होतं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : काही दिवसापूर्वी, पिंक बॉल टेस्टमध्ये शतक झळकावणारी भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधाना (Smriti Mandhana)ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. तिच्या या धडाकेबाज खेळीनंतर क्रिकेट जगतात फक्त आणि फक्त तिची हवा पाहायला मिळत आहे. दरम्यान, स्मृती सध्या एका नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने आपल्या सहकारी खेळाडूंसोबत कोलंबिया गायकाच्या गाण्यावर केलेला भन्नाट डान्स व्हायरल(Smriti Mandhana's dance video goes viral) होतं आहे. नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या स्मृती मानधनाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्मृतीसह इतर सहकारी खेळाडू हरमनप्रीत कौर, जेमिमा रोड्रिगेज, राधा यादव दिसत आहेत. यामध्ये सर्वांचा लुक रॉकिंग दिसत आहे. यासर्वांनी कोलंबिया गायक जे बल्विन आणि अमेरिकी रिकॉर्ड निर्माता स्क्रीलेक्स यांच्या " इन दा गेटो " या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. पण, स्मृतीने तिला हा डान्स जबरदस्तीने करायला लावला असल्याचे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
  Don’t judge guys, I was forced to do this अशी तिने या व्हिडिओला कॅप्शन दिली आहे. तिच्या या व्हिडिओला 50 हजारहून अधिक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. भारतीय महिला संघातील क्रिकेटपटू स्मृती मंधाना फक्त मैदानावरील कामगिरीमुळे नव्हे तर तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेक क्रिकेट चाहते तिला नॅशनल क्रश असे देखील म्हणतात. काही दिवसापूर्वी, स्मृतीने गोल्ड कॉस्टवर खेळवल्या जात असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Ind vs Aus) ऐतिहासिक शतक झळकावले. मानधनाच्या कारकिर्दीतील हे पहिले कसोटी शतक आहे. तिने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण केले. पहिल्या डे-नाईट कसोटीत शतक झळकावणारी ती आता दुसरी भारतीय फलंदाज बनली आहे. तिच्या आधी भारतीय पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध हा पराक्रम केला होता. 2019 मध्ये भारताने बांगलादेशविरुद्ध पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात कर्णधार कोहलीने शतक झळकावले. मात्र, तेव्हापासून त्याने एकही शतक ठोकलेलं नाही.
  Published by:Dhanshri Otari
  First published: