24 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा खराब कामगिरी सुरूच आहे. आज अखेरच्या कसोटी सामन्यातही पहिले पाढे पंचावन्नचा कित्ता टीम इंडियाने गिरवलाय. अवघा संघ 187 धावांवर गारद झालाय.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला क्लिन स्वीपपासून वाचण्यासाठी अखेरची संधी आहे. पण टीम इंडियाचा फाॅर्म काही सुधारत नाहीये. जोहान्सबर्ग वांडर्स स्टेडियमवर तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा फ्लाॅप शो पाहण्यास मिळाला. कर्णधार विराट कोहलीने आपल्या स्टाईलने 54 धावा करत अर्धशतक झळकावले. तर चेतेश्वर पुजारानेही 50 धावा केल्यात.
या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला मोठा स्कोअर उभारता आला नाही. भुवनेश्वर कुमारने 30 धावांचं योगदान दिलं. तिन्ही खेळाडूंनी मिळून 134 धावा केल्यात. उर्वरित आठ खेळाडूंनी फक्त 27 धावांची खेळी केली. यालाउत्तर देत दक्षिण आफ्रिकेच्या टीमने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एक बाद सहा धावा केल्या आहेत. आता टीम इंडियाची सर्व मदार गोलंदाजावर असणार आहे.