World Cup : भारताला मोठा धक्का, शिखर धवन संपूर्ण स्पर्धेतून बाहेर!

ICC Cricket World Cup 2019 : सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी रिषभ पंतचा संघात समावेश.

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 04:58 PM IST

World Cup : भारताला मोठा धक्का, शिखर धवन संपूर्ण स्पर्धेतून बाहेर!

लंडन, 19 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत भारताला मोठा धक्का बसला असून सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेत खेळू शकणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. त्याच्या जागी रिषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला आहे. धवनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यावेळी अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी रिषभ पंतला इंग्लंडला बोलावण्यात आलं होतं. धवन किमान शेवटच्या काही सामन्यात खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्याची दुखापत लवकर बरी होत नसल्याने तो खेळणार नाही.

भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन याच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळं तीन आठवडे तो महत्त्वाच्या सामन्यांना मुकणार अशी माहिती सुरुवातीला देण्यात आली होती. त्यानंतर त्याला दोन आठवडे प्लास्टर करावे लागल्याने त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आलं होतं. अद्याप धवनच्या दुखापतीत सुधारणा नसल्यानं अखेर तो जुलैच्या मध्यापर्यंत खेळू शकणार नाही. याबाबत बीसीसीआयकडून ट्विटरवर माहीती दिली आहे.धवन संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्यानं आता भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्याच्या जागी केएल राहुल सलामीला उतरणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीला येऊन केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली होती. दरम्यान पाकविरुद्ध रवेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार षटक अर्धवट ठेवून बाहेर गेला होता.भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीबद्दल इतर कोणतीही माहिती मिळालेली नाही.

Loading...

वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया


SPECIAL REPORT : कॅट फाईट, वातावरण टाईट ; सानियाने वीणाला सुनावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 04:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...