विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी सज्ज

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. 16 डिंसेंबरपासून सुरू होणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरची वर्णी लागली आहे. भुवनेश्वर कुमारला दुखापत झाल्याने तो या मालिकेला मुकला आहे. त्याच्या जागी कोण खेळणार यावर भारताच्या वरिष्ठ निवड समितीने शार्दुलच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळणाऱ्या भुवनेश्वर कुमारला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. त्यामुळे भुवनेश्वरला आगामी एकदिवसीय मालिकेला मुकावे लागले. त्याच्या जागी नवदीप सैनीला संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. सैनीसुद्धा दुखापतीतून सावरला असून त्याने रणजीतून पुनरागमन केलं आहे.

याआधी ऑगस्ट महिन्यातही भुवनेश्वरला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो संघातून बाहेर होता. विंडीजविरुद्ध टी20 मालिकेत तो खेळला पण आता दुखापतीमुळे पुन्हा बाहेर पडला आहे. भुवनेश्वर संघात नसल्याने भारताच्या गोलंदाजीवर परिणाम होणार आहे.

विंडीजविरुद्धच्या टी20 मालिकेत 2-1 ने भारताने विजय मिळवला होता. यात पहिल्या सामन्यात भारताने तर दुसऱ्या सामन्यात विंडीजने बाजी मारली होती. अखेरच्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिका खिशात टाकली होती.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर

Published by: Suraj Yadav
First published: December 14, 2019, 9:10 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading