भारतासाठी अभिमानाची बातमी, हिमा दासची सोनेरी हॅट्ट्रिक

भारतासाठी अभिमानाची बातमी, हिमा दासची सोनेरी हॅट्ट्रिक

भारताची धावपटू हिमा दासनं दोन आठवड्यात तिसरं सुवर्ण पदक पटकावलं.

  • Share this:

क्लांदो(झेक प्रजासत्ताक), 14 जुलै : भारताची धावपटू हिमा दासने आणखी एक सुवर्णपदक जिंकून हॅट्ट्रिक केली आहे. दोन आठवड्यात तिचं हे तिसरं सुवर्णपदक आहे. क्लांदो मेमोरियल अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमानं 200 मीटर प्रकाराता सुवर्ण पटकावलं. हिमानं 200 मीटर अंतर 23.43 सेकंदात पार केलं.

हिमाशिवाय भारताचा मोहम्मद अनसनेसुद्धा सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्यानं 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अव्वल येत दुसऱ्यांदा पदक मिळवलं. अनसने 400 मीटर अंतर 45.21 सेकंदात पार केलं.

हिमा दासने जुलै महिन्याच्या सुरुवातीला 2019 या वर्षातील पहिली स्पर्धा जिंकत सुवर्ण पदक पटकावलं होतं. तिनं पोलंडमध्ये पोजनान अॅथलेटिक्स ग्रांप्रीमध्ये 23.65 सेकंदाची वेळ नोंदवली होती. त्यानंतर कुंटो अॅथलेटिक्समध्येसुद्धा तिने आपली कामगिरी कायम राखली. 8 जुलैला झालेल्या स्पर्धेत हिमाने 23.97 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत सुवर्ण पदकावर नावं कोरंल होतं. याच स्पर्धेत केरळच्या वीके विस्मयानं 24.06 सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक मिळवलं होतं.

वर्ल्ड ज्यूनिअर चॅम्पियन असलेल्या आणि 400 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नावावर असणाऱ्या हिमाची सर्वोत्तम वेळ 23.10 इतकी आहे. गेल्याच वर्षी तिनं ही वेळ नोंदवली होती. गेल्या वर्षभरापासून हिमा पाठदुखीने त्रस्त आहे. त्यातही तिने जबरदस्त कमबॅक करत आपली कामगिरी उंचावली आहे.

SPECIAL REPORT: वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर टीम इंडियात फूट?

First published: July 14, 2019, 4:43 PM IST
Tags: athletics

ताज्या बातम्या