काश्मीरवर ऐतिहासिक निर्णयानंतर शाहिद आफ्रिदी संयुक्त राष्ट्रसंघावर भडकला!

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने याआधी काश्मीर पाकिस्तानला नको आहे असं वक्तव्य केलं होतं. आता काश्मीरमधील कलम 370 हटवण्यात आल्यानंतर त्यानं थेट संयुक्त राष्ट्रसंघालाच प्रश्न विचारले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 08:30 AM IST

काश्मीरवर ऐतिहासिक निर्णयानंतर शाहिद आफ्रिदी संयुक्त राष्ट्रसंघावर भडकला!

इस्लामाबाद, 06 ऑगस्ट : काश्मीरमधील कलम 370 सोमवारी हटवण्यात आलं असून राज्यसभेत जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. यामुळं काश्मीर आता दोन केंद्रशासित प्रदेशात विभागलं जाणार आहे. काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जाही संपुष्टात आला. भारताच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीनं प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघानं हस्तक्षेप करावं असं आफ्रिदीनं म्हटलं आहे. आफ्रीदी म्हणाला की, काश्मीरच्या लोकांना संयुक्त राष्ट्रसंघांच्या प्रस्तावाअंतर्गत त्यांचे अधिकार द्यायला हवेत.

भारताने काश्मीरचा निर्णय घेतल्यानंतर आफ्रीदीनं संयुक्त राष्ट्रसंघावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं थेट संयुक्त राष्ट्रसंघावरच प्रश्न उपस्थित करत युएन झोपले आहे का? असा प्रश्न विचारला. आफ्रिदीनं ट्वीट केलं आहे की, काश्मीरमधील लोकांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रस्तावानुसार त्यांचे अधिकार द्यायला पाहिजेत. जसं आपल्या सर्वांना स्वातंत्र्य आहे तसं त्यांनाही हवं. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना का केली आहे? संयुक्त राष्ट्रसंघ झोपा काढत आहे का? काश्मीरमध्ये मानवताविरोधी कृत्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यात मध्यस्ती करावी असंही त्यानं म्हटलं आहे.

आफ्रिदीनं याआधीसुद्धा काश्मीरबद्दल वक्तव्य केलं आहे. त्यानं स्वतंत्र काश्मीरचा प्रस्तावही ठेवला होता. लंडनमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटलं होतं की, पाकिस्तानला काश्मीर नको आहे. भारतालासुद्धा देऊ नका. काश्मीरला स्वतंत्र ठेवा. यामुळं मानवता जीवंत राहील. पाकिस्तानला त्याचे चार भाग सांभाळणं कठीण आहे. माणुसकी मोठी गोष्ट आहे. काश्मीरमधील लोक मरत असून हे दुर्दैवी आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 मध्ये बदल करण्याची शिफारस केली आहे. कलम 370 हटवल्यास काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा राहणार नाही. राज्याची स्वतंत्र पोलिस यंत्रणा उरणार नाही. तिथे केंद्राच्या अखत्यारित पोलिस यंत्रणा असेल. नवा कायदा लागू करायचा झाला तर त्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीची गरज नसेल. त्यामुळं केद्र सरकार राज्यातील कायदा करू शकेल. तसेच कलम 370 हटवल्यानं संपत्ती खरेदी आणि गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल.

Loading...

आता थेट केंद्र सरकार जम्मू काश्मीरमध्ये विकासाचे प्रकल्प राबवणार आहे. तसेच त्यांची दिल्लीसारखी परिस्थिती होणार आहे. हे कलम हटवल्यानं भ्रष्टाचाराला आळा बसेल असा दावा सरकारने केला आहे. काश्मीरला यापुढे स्वतंत्र झेंडा लावता येणार नाही. दिल्लीप्रमाणे काश्मीरसुद्धा केंद्रशासित प्रदेश होईल. इथलं कामकाज उपराज्यपालाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अखत्यारीत होईल.

SPECAL REPORT : ममतादीदी म्हणतात, 'उडी बाबा जय श्रीराम मोटा भाई' सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 08:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...